Hansika Motwani On Casting Couch: कास्टिंग काऊचच्या बातमीवर हंसिका भडकली, सोशल मीडियावर राग व्यक्त करत म्हणाली...

Hansika Motwani Making Claims Casting Couch: हंसिका मोटवानीने मंगळवारी एका मुलाखतीदरम्यान तेलगू सिनेसृष्टीतील तिच्या कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला.
Hansika Motwani On Casting Couch
Hansika Motwani On Casting CouchSaam Tv

Hansika Motwani Slams Reports Of Casting Couch Experience: बॉलिवूड अभिनेत्री हंसिका मोटवानी नेहमीच आपल्या अभिनयामुळे ती चर्चेत असते. गेल्या वर्षी तिने सोहेल कतुरियासोबत लग्न केले होते. लग्नाची शूटिंग आपल्या चाहत्यांनाही पाहता यावी याकरिता तिने ओटीटीवर लग्नाचा शो टेलिकास्ट केला होता, पण यावेळी ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. हंसिका मोटवानीने मंगळवारी एका मुलाखतीदरम्यान तेलगू सिनेसृष्टीतील तिच्या कास्टिंग काउचचा अनुभव शेअर केला. राग व्यक्त करत हंसिकाने तिच्या ट्विटर हँडलवर एका बातमीचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे.

Hansika Motwani On Casting Couch
Jr NTR Fans Arrested: ज्युनियर एनटीआरच्या बर्थडेला चाहत्यांचा नुस्ता राडा, बोकडाचा बळी देत केले जंगी सेलिब्रेशन

हंसिका मोटवानी म्हणते, “मी कुठेही असे बोललेली नाही, कृपया खोट्या बातम्या देणं बंद करा.” हंसिकाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचला सामोरे जावे लागत असल्याचा दावा अनेक माध्यमांनी केला होता. अनेक मीडिया रिपोर्टसनुसार, कास्टिंग काऊच प्रकरणात कोणाचेही नाव नसून हंसिका मोटवानीने एका अभिनेत्याला धडा शिकवण्यासाठी असं केल्याचे सांगण्यात येत आहे.

एका ट्विटमध्ये हंसिकाने माध्यमांना, सत्य पडताळूनच बातमी प्रकाशित करण्याचे आवाहन केले आहे. हंसिका ट्विट करत म्हणते, “काही बातम्या करण्यापूर्वी माध्यमांनी बातमीचे फॅक्ट चेक करणं खूप महत्वाचे आहे, कृपया त्यांनी बातम्यांचं फॅक्ट चेक करावं. मी कधीही न केलेली गोष्ट तुम्ही बातमी म्हणून प्रकाशित करतात. कृपया बातम्या करताना त्यांचं फॅक्ट चेक करूनच बातमी प्रकाशित केली होती.” (Social Media)

Hansika Motwani On Casting Couch
Kiran Mane New Serial: किरण माने बिग बॉसनंतर झळकणार नव्या मालिकेत, पोस्ट शेअर करत दिली महत्वाची अपडेट...

हंसिकाने 2003 मध्ये तब्बू स्टारर 'हवा' चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. पुढे तिने 'कोई मिल गया', 'जागो', 'हम कौन हैं' आणि 'अबरा का डबरा' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. याशिवाय तिने 'शका लाका बूम बूम', 'सोन परी' आणि 'करिश्मा का करिश्मा' यांसारख्या लहान मुलांच्या टीव्ही शोमध्येही काम केले.

2007 मध्ये हंसिकाने नायिका म्हणून पदार्पण केले. अल्लू अर्जुन स्टारर 'देसमुदुरु' आणि हिमेश रेशमियाचा 'आप का सुरुर' हे तिचे त्यावर्षीचे पहिले चित्रपट होते. त्यानंतर आरोप होऊ लागले की दोन वर्षांत हंसिकाने बाल कलाकारापासून चित्रपटांमध्ये नायिकेची भूमिका साकारण्यास सुरुवात केली. ती अचानक इतकी मोठी कशी झाली?

हंसिकाचा 'महा' 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता. आगामी काळात ती 'पार्टनर', 'राउडी बेबी', 'गांधारी'सह अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com