Jr NTR Fans Arrested: ज्युनियर एनटीआरच्या बर्थडेला चाहत्यांचा नुस्ता राडा, बोकडाचा बळी देत केले जंगी सेलिब्रेशन

Jr NTR Fans: अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या नऊ चाहत्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Jr NTR's 9 Fans were Arrested
Jr NTR's 9 Fans were ArrestedInstagram @jrntr

South Star Jr Ntr 9 Fans Arrested: साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि त्याच्या चित्रपटांची चाहत्यांमध्ये खूप क्रेझ आहे. नुकताच एनटीआरचा 40 वा वाढदिवस झाला. यादरम्यान त्याच्या चाहत्यांनीही त्याचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला.

परंतु अभिनेत्याचा वाढदिवस साजरा करणाऱ्या नऊ चाहत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्युनियर एनटीआरच्या नऊ चाहत्यांना यज्ञकार्यात सहभागी असल्याने पोलिसांनी अटक केली आहे. (Latest Entertainment News)

Jr NTR's 9 Fans were Arrested
TMKOC Producer In Trouble: असित मोदीच्या अडचणीत आणखी भर, बबिताचे नाव घेत अभिनेत्री मोनिका भदोरियाने केला मोठा खुलासा

ज्युनियर एनटीआरने 20 मे रोजी त्याचा 40 वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून, चाहत्यांनी कथितपणे दोन बकऱ्या मारल्या आणि त्यांचे रक्त जूनियर एनटीआरच्या फ्लेक्स बॅनरवर सांडले.

याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी चाहत्यांना अटक केली आहे. पी शिवा नागा राजू, के साई, जी साई, डी नागा भूषणम, व्ही साई, पी नागेश्वर राव, वाय धरणी, पी शिवा आणि बी अनिल कुमार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

रिपोर्ट्सनुसार, सिरी कृष्णा आणि सिरी वेंकट यांच्यासोबत ज्युनियर एनटीआरचा वाढदिवस साजरा करण्यासाठी शिव नागा राजू आणि त्याचे मित्र थिएटरमध्ये गेले. त्यांनी कथितरित्या बोकडाचा बाली देत ज्युनियर एनटीआरच्या बॅनरवर त्यांचे रक्त चढवले आणि वापरलेल्या धारदार शस्त्रांसह त्या बकऱ्या घेऊन गेले. त्यानंतर विजयवाडा येथील रॉबर्सनपेट पोलिसांनी आरोपींना अटक केली.

Jr NTR's 9 Fans were Arrested
Jr Ntr Fans Burn Firecrackers In Theater: ज्युनियर एनटीआर बर्थडेला चाहत्यांनी थिएटर पेटवलं; व्हिडिओ व्हायरल

ज्युनियर एनटीआरच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त आणखी एक घटना उघडकीस आली. त्याचा 20 वर्षे जुना ब्लॉकबस्टर चित्रपट 'सिम्हाद्री' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटगृहात अभिनेत्याच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती आणि चित्रपट पाहताना अभिनेत्याच्या चाहत्यांचे आनंद साजरा करण्यासाठी चित्रपटगृहात फटाके फोडले. फटाक्यांमुळे सिनेमा हॉलमध्ये आग लागली.

ज्युनिअर एनटीआरच्या 'देवरा' आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. ज्युनिअर एनटीआर आणि हृतिक वॉर २ मध्ये दिसणार असल्याची माहिती या दोघांनी दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com