Gautami Patil Song : गौतमीचा नखरा पाहून नेटकरी फिदा; आयटम साँग सोनचाफाची राज्यभरात चर्चा

Gautami Patil Sonchafa Song : गौतमी पाटीलच्या दिलखेचक अदांनी रंगलेलं ‘सोनचाफा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला अल्पावधीतच जबरदस्त प्रतिसाद मिळत असून गौतमीच्या परफॉर्मन्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
Gautami Patil Song : गौतमीचा नखरा पाहून नेटकरी फिदा; आयटम साँग सोनचाफाची राज्यभरात चर्चा
Gautami Patil Sonchafa SongSaam Tv
Published On
Summary
  • ‘सोनचाफा’ गाण्यात गौतमी पाटील धडाकेबाज परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे.

  • अल्पावधीतच गाण्याला रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.

  • ‘साईरत्न एंटरटेनमेंट’च्या युट्युब चॅनेलवर हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

  • या गाण्याचे बोल, संगीत आणि गौतमीच्या अदांनी ‘सोनचाफा’ गाण्याला चारचांद लावले आहेत.

'माझ्या रुपावर फिदा झाली दुनिया सारी' या 'सोनचाफा' गाण्यातील ओळींप्रमाणेच नृत्यांगना गौतमी पाटीलच्या रूपावर खरंच दुनिया फिदा आहे, यांत शंकाच नाही. काही दिवसांपासून 'सोनचाफा' गाण्याची चर्चा सुरु होती, अखेर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. गौतमी पाटीलचं दिलखेचक अदांनी भरलेलं हे नवंकोरं 'सोनचाफा' हे गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. गाण्याच्या ओळींनी आणि गौतमीच्या नृत्याने अर्थातच थिरकायला भाग पाडलं आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. हे गाणं 'साईरत्न एंटरटेनमेंट' या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं आहे.

यापूर्वीही 'साईरत्न एंटरटेनमेंट'साठी गौतमी पाटीलने दोन गाणी केली. 'सुंदरा' आणि 'कृष्ण मुरारी' या गौतमीच्या दोन्ही गाण्यांना भरभरुन प्रतिसाद मिळाला. यानंतर आता 'साईरत्न एंटरटेनमेंट' गौतमीसह 'सोनचाफा' हे नवं गाणं घेऊन आलं आहे. 'सोनचाफा' या आयटम साँगवर गौतमीचा नयनरम्य असा नृत्याविष्कार साऱ्यांना बेधुंद करणारा आहे.

गौतमीच्या लूकनेही साऱ्यांना घायाळ केलं आहे. 'साईरत्न एंटरटेनमेंट' या प्रॉडक्शन हाऊसच हे गाणं निर्माते संदेश विठ्ठल गाडेकर आणि सुरेश विठ्ठल गाडेकर यांनी निर्मित केलं आहे. दिग्दर्शक अर्चित वरवडे यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. संगीतकार रोहित नागभिडे यांनी संगीत केलेलं हे गाणं गायिका मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केलं आहे. तर गाण्याचे बोल वैभव देशमुख यांनी लिहिले आहे. या गाण्याच्या प्रवासाबाबत बोलताना गौतमी पाटील म्हणाली, "

Gautami Patil Song : गौतमीचा नखरा पाहून नेटकरी फिदा; आयटम साँग सोनचाफाची राज्यभरात चर्चा
MNS Raj Thackeray : हे हिंदी हवं कशाला? स्टेशनच्या नावावरून राज ठाकरे भडकले, नेमकं काय घडलं ?

'साईरत्न एंटरटेनमेंट'बरोबर हे माझं तिसरं गाणं आहे. सोनचाफा हे गाणं करताना खूप मज्जा आली. गाण्यातील लूक, डान्स स्टेप सगळंच भारी होतं. आणि माझ्या साऱ्या चाहत्यांना हे गाणं नक्की आवडेल याची खात्री आहे". तर निर्माते संदेश गाडेकर म्हणाले, "'साईरत्न एंटरटेनमेंट' नेहमीच रसिकांसाठी नवनवीन गाणी घेऊन येत असतं. अशातच आता सोनचाफा हे गाणं या यादीत आलं आहे. गौतमीच्या डान्सने तर साऱ्यांना वेड केलं आहे. तिच्या नृत्याचे लाखो चाहते आहेतच आणि आताही या सोनचाफा मधील तिचा परफॉर्मन्स अनेकांच्या मनावर राज्य करत आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com