Gauhar Khan Blessed With Baby Boy: गौहर खानच्या घरी चिमुकल्याचं आगमन; आईनं खास लेकासाठी शेअर केली पहिली पोस्ट...

Gauhar Khan Share Post: गौहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत मुलगा झाल्याचे सांगितले आहे.
Gauhar Khan- Zaid Darbar Blessed With Baby Boy
Gauhar Khan- Zaid Darbar Blessed With Baby BoyInstagram @zaid_darbar

Gauhar Khan Shared Good News: बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार हे आई-वडील झाले आहेत. बुधवारी 10 मे रोजी गौहरने मुलाला जन्म दिला. गौहर आणि झैदला सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

अनेक सेलिब्रिटी या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. गौहरने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. चाहत्यांसोबतच बॉलीवूड सेलिब्रिटी यावर कमेंट करत आहेत आणि गौहर आणि झैदच्या मुलाला आशीर्वाद देत आहेत.

गौहर खानप्रेग्नेंसीमुळे चर्चेत होती. तसेच नुकतेच तिने तिच्या मॅटर्निटीशूट देखील केले होते आणि हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. (Latest Entertainment News)

Gauhar Khan- Zaid Darbar Blessed With Baby Boy
Adah Sharma Birthday Gift: अदा शर्माचं बेस्ट बर्थडे गिफ्ट: 'द केरला स्टोरी'नंतर 'द गेम ऑफ गिरगिट' या नवीन चित्रपटाची घोषणा

10 मे रोजी तिने मुंबईतील रुग्णालयात मुलाला जन्म दिला आहे. गौहरने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करत लिहिले, मुलगा झाला, 10 मे 2023 रोजी खऱ्या अर्थाने आनंदाची अनुभूती आली. आमच्या मुलासाठी दिलेल्या प्रेम आणि प्रार्थनेसाठी सर्वांचे आभार मानतो. आम्हला आमच्या मुलाचे पालकत्व स्वीकारून खूप आनंद झाला आहे, झैद आणि गौहर.

गौहरच्या या पोस्टवर अनुष्का शर्मा, अनिता हसनंदानी, विक्रांत मॅसी, किश्वर मर्चंट, डबू रतलानी, युविका चौधरी, सोनाली कुलकर्णी, सुनील ग्रोव्हर, सपना चौधरी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी तिचे अभिनंदन केले आहे.

गौहर खान आणि झैद दरबारच्या लव्ह स्टोरी विषयी सांगायचे तर, झैदने गौहर खानला सुपरमार्केटमध्ये खरेदी करताना पहिले. झैदला गौहर पहिल्या नजरेतच आवडली होती. गौहरने झैदकडे लक्ष दिले नाही आणि शॉपिंग करून घरी गेली.

यानंतर झैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि दोघेही बोलू लागले. हळूहळू मैत्री झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

यानंतर दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले. गौहर आणि झैदच्या वयात 12 वर्षांचे अंतर आहे, पण ते म्हणतात की प्रेमात वय आणि धर्म बघत नाहीत, प्रेम फक्त होते. झैदी कोरिओग्राफर आहे. संगीत दिग्दर्शक इस्माईल दरबार यांचा तो मुलगा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com