Gadar 2 Screening At Parliament: अभिमानास्पद... सनी- अमिषाच्या ‘गदर २’चे संसदेत होणार स्पेशल स्क्रिनिंग; तीन दिवस दाखवणार ‘एवढे’ शो

Gadar 2 Special Screening: संसद भवनाच्या नवीन इमारतीत ‘गदर २’ च्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं आहे.
Gadar 2 Screening In New Parliament Building
Gadar 2 Screening In New Parliament BuildingTwitter
Published On

Gadar 2 Screening In New Parliament Building

अवघ्या काही दिवसातच ५०० कोटींच्या रेसमध्ये सामील झालेल्या ‘गदर २’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल अभिनित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. तब्बल २२ वर्षानंतर फार मोठ्या गॅपने ‘गदर’ चा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इतक्या मोठ्या गॅपने जरी हा चित्रपट प्रदर्शित होत असला, चित्रपटाने २ आठवड्यातच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार करत आता ५०० कोटींच्या ही रेसमध्ये दाखल झालाय. दरम्यान संसद भवनाच्या नवीन इमारतीत या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं आहे. २५ ऑगस्टपासून पुढे तीन दिवसांसाठी हा चित्रपट संसद भवनातील सदस्यांसाठी दाखवण्यात येणार आहे.

Gadar 2 Screening In New Parliament Building
Marathi Movie Baaplyok: बाप म्हणजे काय? याचा शोध घेणारा 'बापल्योक' १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ची आजपासून संसद भवनाच्या नवीन इमारतीत स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं आहे. हे स्पेशल स्क्रीनिंग आजपासून सुरू होणार असून पुढील तीन दिवस चालणार आहे. या चित्रपटाचे दररोज ५ शो होणार आहेत. यावेळी भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड संसद भवनातील ‘गदर २’ च्या स्क्रिनिंगला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या स्पेशल स्क्रिनिंगला सकाळी ११ वाजल्यापासून सुरूवात होणार असून यावेळी चित्रपटातले कलाकार उपस्थित राहणार नाहीत.

Gadar 2 Screening In New Parliament Building
Marathi Movie Baaplyok: बाप म्हणजे काय? याचा शोध घेणारा 'बापल्योक' १ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला

ETimes च्या वृत्तानुसार, नवीन संसद भवनात ‘गदर २’च्या स्क्रीनिंगबद्दल, चित्रपट दिग्दर्शक अनिल शर्मा म्हणाले, "आम्हाला चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी संसदेकडून एक मेल आला होता. या माध्यमातून आम्हाला विशेष स्थान, सन्मान मिळाला आहे. माझ्यासाठी दिल्लीला जाणे कठीण आहे, पण मी उद्या दिल्लीला जाण्याचा प्रयत्न करेल. मला मिळालेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपतींना देखील चित्रपट पाहण्याची इच्छा आहे."

Gadar 2 Screening In New Parliament Building
Jawan Connection With Holiday In Delhi: दिल्लीकरांना ३ दिवस सुट्टी जाहीर! शाहरुखच्या फॅन्सनी जोडलं जवानसोबत कनेक्शन, वाचा सविस्तर

सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा अभिनित ‘गदर २’ने नुकताच ४०० कोटींचा टप्पा पार केला आहे तर, ‘गदर २’ने जगभरात ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी दंगल’ व ‘केजीएफ’चा रेकॉर्ड मोडला होता. ‘गदर २’ हा २००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर: एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सीक्वल आहे. ‘गदर २’ बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’ला मागे टाकण्याची शक्यता सध्या, सोशल मीडियावर होत आहे. कारण चित्रपट प्रत्येक दिवशी १० कोटीपेक्षा जास्त कमाई करत आहे. या चित्रपटामधील गाणी प्रचंड हिट झाल्यामुळे प्रेक्षकांचा कल सर्वाधिक चित्रपटगृहाकडे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com