भारतीय बॉक्स ऑफिस एका पाठोपाठ एक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. गेल्या गुरुवारी आणि शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपट प्रदर्शित झाले. यात चित्रपमध्ये रजनीकांतचा 'जेलर', देओलचा 'गदर 2' आणि अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांच्या 'ओएमजी २' या चित्रपटांचा समावेश आहे.
या दिग्गज कलाकाराच्या चित्रपटांपैकी जेलर आणि गदर 2 या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. त्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन झपाट्याने वाढत आहे. चला पाहूया कोणत्या चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन आहे.
अनिल शर्मा दिग्दर्शित गदर 2 ने भारतात 300 कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. Sacnilk.com नुसार, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या शुक्रवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर जवळपास ₹20 कोटी कमावले. 'गदर 2' 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
गदर 2 बॉक्स ऑफिस कलेक्शन
Sacnilk.com च्या मते, दिवसाच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, गदर 2 ने आठव्या दिवशी भारतात ₹19.50 कोटींची कमाई केली. गदर 2 ने रिलीजच्या पहिल्या आठवड्यात एकूण 284.63 कोटी रुपयांची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०४.१३ कोटींची कमाई केली आहे.
जेलर बॉक्स ऑफिस कलेक्शन
रजनीकांतच्या जेलरने नवव्या दिवशी भारतात सर्व भाषांमध्ये ₹ 9 कोटी नेट कमावले, अर्ली ट्रेंड्सनुसार, चित्रपटाचे एकूण कलेक्शन 244.85 कोटी नेट झाले. Sacnilk.com च्या अहवालानुसार, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 10 व्या दिवशी, शनिवारी भारतात चित्रपत्रांच्ये कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकतो आणि 16 कोटी नेट कमवू शकतो. चित्रपट समीक्षक रमेश बाला यांच्या मते, जेलर देखील 'तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या दिशेने जात आहे'.
'OMG 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन
अक्षय कुमारच्या ओ माय गॉड 2 (OMG 2) चित्रपटाने अर्ली ट्रेंड्सनुसार शुक्रवारी भारतात ₹5.6 कोटींचा व्यवसाय केला. Sacnilk.com च्या अहवालानुसार, OMG 2 ने आत्तापर्यंत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे ₹90.65 कोटी कमाई केली आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 85.05 कोटींची कमाई केली आहे.
रॉकी और रानी की प्रेम कहानी बॉक्स ऑफिस कलेक्शन
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटाच्या यशानंतर करण जोहरचा आनंद गगनात मावत नाहीय. शुक्रवारी, त्याने जाहीर केलेकी या चित्रपटाने रिलीजच्या तीन आठवड्यांत जागतिक बॉक्स ऑफिसवर ₹300 कोटींची कमाई केली आहे. करणने इंस्टाग्राम पोस्ट करत ही मोठी बातमी शेअर केली आणि त्याच्या चाहत्यांचे आभार मानले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.