OTT Releases This Week: वीकेंडला प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवाणी! 'ताली', 'गन्स अँड गुलाब्ज'सह अनेक दमदार चित्रपट आणि वेबसीरीज प्रदर्शित

OTT Releases: प्रेक्षकांसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी असणार आहे.
OTT वर चित्रपट आणि वेब सीरीजची या आठवड्यात मेजवानी; पहा यादी
OTT वर चित्रपट आणि वेब सीरीजची या आठवड्यात मेजवानी; पहा यादीSaam Tv
Published On

Guns And Gulaabs Released:

बॉक्स ऑफिस गदर २ , ओएमजी २ या हिंदी भाषेतील चित्रपटांसह अनेक मराठी, तामिळ, तेलगू चित्रपट देखील धुमाकूळ घातलं आहेत. त्याला काळ म्हणजे शुक्रवारी अभिषेक बच्चनचा 'घुमर' चित्रपट देखील प्रदर्शित झाला आहे.

या सगळ्यात ओटीटी प्लॅटफॉम्स देखील मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. प्रेक्षकांसाठी ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवड्यात मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. चला तर जाणून घेऊन कोणत्या प्लॅटफॉर्मवर काय प्रदर्शित होणार आहे?

गन्स अँड गुलाब्ज

ही एक पिरिअड क्राईम ट्रेलर सीरीज आहे, ज्या ९०च्या दशकातील काळ दाखविण्यात आला आहे. या वेबसीरीजमधील कथा गुलाबगंज या काल्पनिक गावात दाखविण्यात आली आहे. या वेबसीरीजमध्ये राजकुमार राव, दुलकर सलमान, आदर्श गौरव, टीजे भानू, गुलशन देवैया आणि दिवंगत सतीश कौशिक महत्तवाच्या भूमिका साकारल्या आहेत.

१९२०- हॉरर्स ऑफ द हार्ट

डिस्नी प्लेस हॉटस्टारवरील ही हॉरर फिल्म स्ट्रीम होत आहे. कृष्णा भट्ट दिग्दर्शित या चित्रपटात अविका गौर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि यशस्वी झाला.

माथागम

प्रसाथ मुरुगेसन लिखित-दिग्दर्शित वेबसीरीज माथागम डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित झाली आहे. या मालिकेत अथर्व, मणिकंदन, निखिला विमल आणि डीडी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा शो तामिळ, हिंदी, तेलुगु, मल्याळम, कन्नड, मराठी आणि बंगाली या सात भाषांमध्ये प्रसारित करण्यात आली आहे. अथर्व पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, तर मणिकंदन पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे.

कोलाई

प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होत असलेल्या, या तमिळ रहस्यपटात विजय अँटनी, मीनाक्षी चौधरी, रितिका सिंग आणि राधिका सरथकुमार मुख्य भूमिकेत आहेत. बालाजी के कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. थ्रिलर चित्रपटाची कथा मॉडेल गायिका लैलाच्या भोवती फिरते जिचा रहस्यमयरित्या मृत्यू होतो. या गुन्ह्याची उकल करण्याची जबाबदारी आयपीएस संध्या मोहनराज (रितिका) आणि माजी तपास अधिकारी विनायक (विजय) यांच्यावर देण्यात आली आहे.

आयीराथोन्नु नुनकल

मल्याळम भाषेतील चित्रपट Aayirathonnu Nunkal हा सोनी LIV वर प्रसारित झाला आहे. थामर केवी दिग्दर्शित थ्रिलर चित्रपटाची कथा दुबईमध्ये दाखवण्यात आली आहे. काही मित्रांचा ग्रुप एका मेन्शन जमतात. तिथे ट्रुथ अँड डेअर हा गेम खेळायला सुरुवात करतात आणि कथा पुढे जाते.

मास्क गर्ल

किम जंग-हुन यांनी दिग्दर्शित केलेली ही सर्वोत्कृष्ट कोरियन थ्रिलर वेबसीरीज आहे. या मालिकेत कोरियन फिल्म इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध चेहरे दिसणार आहेत, ज्यात गो ह्यून-जुंग, अहं जे-होंग आणि येओम हाय-रॅन प्रमुख भूमिकेत आहेत.

10 डेज ऑफ अ बॅड मॅन

चित्रपटाची कथा एका खाजगी गुप्तहेराभोवती फिरते जो त्याच्या वैयक्तिक समस्यांसह खुनाची उकल करतो. ड्रामा आणि मर्डर मिस्ट्री प्रकारातील हा चित्रपट 18 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

हरलान कोबेन्स शेल्टर

ही वेबसीरीज सस्पेन्स थ्रिलरने परिपूर्ण आहे, त्यात कॉमेडीच्याही छटा आहे. या वेबसीरीजची कथा किशोरवयीन मिकी बोलिटर आणि त्याचा नवीन मित्र हार्लन कोबेन यांच्या रहस्यमयपणे बेपत्ता झाल्याची चौकशी करत आहे. ही मालिका 18 ऑगस्ट रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली.

एपी धिल्लन: फर्स्ट ऑफ अ काइंड

पंजाबी गायक एपी धिल्लनचा सुपरस्टार आणि जागतिक संगीत आयकॉन बनण्यापर्यंतचा रोमांचकारी प्रवास या डॉक्युसिरीजमध्ये पाहायला मिळेल . या माहितीपटाचे दिग्दर्शन जय अहमद यांनी केले आहे. चार भागांमध्ये बनवलेली ही माहितीपट 18 ऑगस्ट रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला .

नीयत

विद्या बालनचा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट नीयत प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट रु.349 च्या रेंटवर उपलब्ध आहे. हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.

माइंड केज

थ्रिलर माइंडकेज शुक्रवारी लायन्सगेट प्लेवर रिलीज झाली. हा चित्रपट गेल्या वर्षी आला होता. नेटफ्लिक्सची सस्पेन्स थ्रिलर वेबसीरीज मॅनिफेस्टोमधील अभिनेत्री मेलिसा रॉक्सबर्ग या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

प्रदर्शित झालेले चित्रपट आणि वेबसीरीज

ताली

सुष्मिता सेन बऱ्याच दिवसांपासून ताली वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. रवी जाधव दिग्दर्शित या वेबसीरीजमध्ये सुष्मिता सेन गौरी सावंतची भूमिका साकारत आहे . ही वेबसीरीज काल्पनिक नसून खऱ्या जीवनावर आधारित आहे. ही वेबसीरीज १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे .

डेप Vs हर्ड (Depp vs Heard)

जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या यांची ट्रायल केस कोणी कसं विसरेल? 2022 मध्ये हे मानहानीचे प्रकरणाने खूप गाजले. व्हर्जिनिया कोर्टात जॉनी डेप आणि एम्बर हर्ड यांच्या खटल्याची सुनावणी सुरू होती, त्यादरम्यान असे खुलासे झाले की सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणावर बनलेली 'डेप व्हर्सेस हर्ड' ही डॉक्युमेंट्री सीरीज 16 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे .

मिगेल वांट्स टू फाइट

या चित्रपटाची कथा एका १७ वर्षाच्या मुलगा आणि त्याच्या मित्रांभोवती फिरते. मुलगा भांडणांपासून लांब राहतो, पण एका घटनेने त्याचे आयुष्य बदलून जाते. ड्रामा आणि कॉमेडीने परिपूर्ण असलेला हा चित्रपट 16 ऑगस्टला Disney + Hotstar वर प्रदर्शित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com