Famous Singer Death : प्रसिद्ध गायक काळाच्या पडद्याआड; वयाच्या ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Famous Singer-Composer Death : प्रसिद्ध गायक-संगीतकार यांचे वयाच्या 68 वर्षी निधन झाले आहे. संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे.
Famous Singer-Composer Death
Famous Singer Death SAAM TV
Published On
Summary

लोकप्रिय गायक-संगीतकार एमसी सबेसन यांचे निधन झाले आहे.

वयाच्या 68 वर्षी एमसी सबेसन यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

एमसी सबेसन याचे संगीत विश्वात मोठे नाव होते.

संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक-संगीतकार एमसी सबेसन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 68 वर्षी एमसी सबेसन (MC Sabesan) यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सबेसन यांचे गुरुवारी चेन्नई येथे मृत्यू झाला. खूप वेळापासून ते आजारी होते. एमसी सबेसन आणि मुरली ही तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरहिट जोडी होती. एमसी सबेसन यांना सबेश म्हणूनही ओळखले जायचे.

गायक-संगीतकार एमसी सबेसन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेकडून आणि सेलिब्रिटींकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एमसी सबेसन यांचे गुरुवारी 23 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले. ते चेन्नईमध्ये असताना त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने निधन झाले.

मीडिया रिपोर्टनुसार, दिवंगत गायक-संगीतकार यांच्यावर 24 ऑक्टोबर 2025ला दुपारी 3 वाजता चेन्नई येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. एमसी सबेसन यांच्या मागे गीता आणि अर्चना या दोन मुली आणि अभिनेता म्हणून काम करणारा मुलगा कार्तिक आहे. त्यांनी अनेक सुपरहिट गाणी केली आहेत. एमसी सबेसन आणि मुरली हे भाऊ आहेत. दोघांनी गोरीपालयम, मिलागा, थावामै थावामिरंधू, पराई, अदाइकलम, इम्साई अरासन 23 वा पुलिकेसी, पोक्किशम, इंगल आसन आणि कूडल नगर यासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. एमसी सबेसन हे संगीतकार आणि पार्श्वगायक होते.

Famous Singer-Composer Death
Hardeek Joshi-Akshaya Deodhar : राणादा अन् पाठकबाईंनी दिली गुडन्यूज, घरात आला नवा सदस्य

गेल्या आठवड्यात तीन प्रमुख कलाकारांचे निधन झाले आहे. बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेता पंकज धीर आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचे 15 ऑक्टोबर रोजी निधन झाले. 20 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या दिवशी ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता-कॉमेडियन असरानी यांचे निधन झाले. आता तमिळ चित्रपटसृष्टीतून चित्रपट गायक आणि संगीतकार एमसी सबेसन यांचेही निधन झाले.

Famous Singer-Composer Death
"जय श्री कृष्णा"; स्मृती इराणींच्या KSBKBT 2मध्ये बिल गेट्स यांची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com