Diljit Dosanjh: प्रसिद्ध भारतीय गायकाचा ऑस्ट्रेलियात अपमान; लोक म्हणाले, 'कॅब ड्रायव्हर आला...'

Diljit Dosanjh: दिलजीत हा बॉलिवूडचा एक लोकप्रिय गायक आणि अभिनेता आहे. तो अलिकडेच 'सरदार जी ३' आणि 'डिटेक्टिव्ह शेरदिल' या चित्रपटांमध्ये दिसला. त्याचा 'ऑरा' हा अल्बम नुकताच रिलीज झाला.
Diljit Dosanjh
Diljit Dosanjh
Published On

Diljit Dosanjh: गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ हा त्याचा नवीनतम अल्बम, 'ऑरा'ला प्रमोट करण्यासाठी जागतिक दौऱ्यावर आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियात असून त्याच्या सिडनी शोच्या आधी, त्याने बॅकस्टेज क्षणांची एक झलक शेअर करताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर, त्याच्यावर वर्णद्वेषी टिप्पण्या झाल्या असून, काही लोकांनी त्याला "कॅब ड्रायव्हर" म्हटले.

दिलजीतचे धक्कादायक विधान

एका व्हिडिओमध्ये, दिलजीतने स्पष्ट केले की तो ऑस्ट्रेलियात उतरताच पापाराझींनी फोटो काढण्यास सुरुवात केली. जेव्हा हे फोटो सोशल मीडियावर समोर आले तेव्हा अनेक वापरकर्त्यांनी खूप विचित्र टिप्पण्या केल्या. तो म्हणाला, "काही वृत्तसंस्थांनी माझ्या आगमनाची बातमी दिली आणि लोकांनी कमेंटमध्ये लिहिले, 'फ्रेश उबर ड्रायव्हर एज हियर' किंवा तर एकाने लिहीले, कॅब ड्रायव्हर आला...'असे बरेच द्वेषपूर्ण संदेश मी पाहिले. माझा विश्वास आहे की जगाने सीमांच्या पलीकडे एकत्र आले पाहिजे.

Diljit Dosanjh
Bigg Boss 19: 'आम्हा दोघांना चंद्र...'; बिग बॉसच्या घरात तान्या मित्तलने दिली प्रेमाची कबूली; म्हणाली...

राग व्यक्त करण्याऐवजी, त्याने सकारात्मक संदेश दिला

दिलजीतने स्पष्ट केले की त्याला "कॅब ड्रायव्हर्स" किंवा "ट्रक ड्रायव्हर्स"अशा तुलना मला त्रास देत नाहीत, कारण हे लोक समाजाचा कणा आहेत. ट्रक ड्रायव्हर्सशिवाय, अन्नधान्यही घरापर्यंत पोहोचले नसते. मी कोणावरही रागावलो नाही; खरं तर, मला फक्त या लोकांबद्दल प्रेम आहे."

Diljit Dosanjh
Marathi Movie: मराठी चित्रपटांना साऊथचा टच; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'मध्ये 'हे' कलाकार दिसणार ॲक्शन अवतारात

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, दिलजीतने पंजाबी ते बॉलिवूडपर्यंत मजल मारली आहे. तो अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'सरदार जी ३' (पंजाबी) आणि 'डिटेक्टिव्ह शेरदिल' (हिंदी) या चित्रपटांमध्ये दिसला. 'सरदार जी ३' चित्रपटामुळे वाद निर्माण झाला, विशेषतः पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरच्या कास्टिंगवरून. हा चित्रपट अद्याप भारतात प्रदर्शित झालेला नाही, परंतु तो परदेशातही हिट झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com