सुपरस्टार यशचा चित्रपट KGF-2 सध्या बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला आहे. चित्रपटाबद्दल तसेच त्यातील डायलॉग्सबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्साह आहे. सध्या चित्रपटातील यशचा एक डायलॉग चांगलाच गाजला आहे. तो म्हणजे - व्हायलेन्स, व्हायलेन्स, व्हायलेन्स.. मला ते आवडत नाही. मी ते टाळतो. पण हिंसेला मी आवडतो आणि मी ते टाळू शकत नाही. (“Violence..Violence..Violence! I don’t like it. I avoid, but, violence likes me!”) या कडक डायलॉगबद्दल सध्या सोशल मीडियावर खूप मिम्स बनत आहेत. यशचा हा डायलॉग एक भन्नाट अंदाजात समोर आला आहे. यशच्या एका फॅनने आपल्या लग्नपत्रिकेवर हा डायलॉग अनोख्या अंदाजात छापला असून लग्नपत्रिकेतील या ओळी खूप हास्यास्पद आहेत. (KGF 2 Dialogue On Wedding Card)
या लग्नपत्रिकेत मूळ डायलॉग व्हायलेन्सच्या जागी लग्न (Marriage) असा शब्द वापरण्यात आला आहे. त्यामुळे हा डायलॉग ‘लग्न, लग्न, लग्न.. ते मला आवडत नाही, मी ते टाळतो, पण माझ्या नातेवाईकांना लग्न आवडतं, म्हणूनच ते मी टाळू शकत नाही, असा गमतीशीर पद्धतीने त्याने हा डायलॉग आपल्या लग्न पत्रिकेवर छापला आहे. ही पत्रिका सध्या तुफान व्हायरल होत आहे. तसेच ट्विटरवर या लग्नपत्रिकेवर भरभरून कमेंट्स पाहायला मिळत आहेत. (KGF 2 Dialogue Printed On Wedding Card)
‘KGF Chapter- 2’ या चित्रपटाने हिंदी भाषेतून सुद्धा फक्त सात दिवसांत कमाईचा 250 कोटींचा टप्पा पार केला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने 255.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.