
सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी
सलमान खान..बॉलिवूडचा भाईजान. 59 व्या वर्षीसुध्दा जिममध्ये तीन तीन तास व्यायाम करणारा बॉलिवूडचा मॅचो मॅन. तरुणांचा स्टाईल आयकॉन. बॉलिवूडचा दंबग सुपरस्टार. साठीला आलेला असला तरी त्याचं फॅन फॉलोईंग मात्र कमी होत नाही. पण बाहेरून बघताना फिट असणारा सलमान एक नव्हे तर तीन गंभीर आजारांनी त्रस्त आहे. स्वत: सलमाननेच एका कार्यक्रमात आपल्या आजारांबद्दल माहिती दिलीय.
बॉलिवूडचा भाईजान असणाऱ्या सलमान खानचे तीनही आजार मेंदूशी संबंधित आहेत. या गंभीर आजारांमुळेच आपल्याला चटकन राग येत असल्याचंही सलमाननं मुलाखतीत सांगितलं. काय आहेत सलमानचे न्यूरॉलॉजिकल आजार.
ब्रेन एन्युरिझम
मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये फुगवटा तयार होतो.
एव्ही मॅल्फॉर्मेशन
शरीरातील केशनलिकांना वगळून रक्तप्रवाह थेट धमन्या आणि शिरांमध्ये जातो.
ट्रायजेमिनल न्यूरल्जिया
चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये अचानकपणे तीव्र वेदना होतात.
अजूनही लाखो दिलांची धडकन असणाऱ्या सलमान खानला हे आजार असल्याचं पहिल्यांदाच समोर आलंय..साहजिकच त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच आह पण या आजारांना घाबरून जाईल तो सलमान कसला. कारण त्याचाच डायलॉग सांगायचा झाला तर.."हर वो आदमी जो अपनी जिंदगी में एक बार डर के आगे जीत गया... वही सुलतान है!"
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.