OTT TOP 5 MOVIES : हॉलिवूडलाही मात देतील 'हे' ५ चित्रपट; शेवटचा ट्विस्ट पाहून थक्क व्हाल

OTT TOP 5 MOVIES : चित्रपट पाहण्यची आवड असेल आणि त्यामध्ये तुम्हाला सस्पेन्स, थ्रिल आणि रहस्यमय कथा आवडत असतील, तर साउथ चित्रपट (South Movies) हा उत्तम पर्याय आहे. सध्या OTT प्लॅटफॉर्मवर अशा अनेक दाक्षिणात्य क्राईम-थ्रिलर चित्रपटांचे हिंदी व्हर्जन उपलब्ध आहे, जे प्रेक्षकांच्या भलतेच पसंतीस उतरत आहेत.
OTT TOP 5 MOVIES
OTT TOP 5 MOVIES META AI
Published On: 

तुम्हालाही असे चित्रपट पाहायला आवडत असतील ज्यामध्ये सुरुवाती पासुन ते शेवटपर्यंत ज्यामध्ये सस्पेंस असेल तसेच काही वेळा नंतर चित्रपट वेगळी दिशा घेइल तर हे साउथ चित्रपट तुमच्यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला मर्डर मिस्ट्री , सिरीयल किलर आणि माइंड गेम्सपर्यंत हे सर्व पाहायला मिळेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटांना तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरुन घरबसल्या आरामात पाहू शकता.

SonyLIV, Hotstar, Prime Video, Netflix आणि JioCinema वर पाहता येणाऱ्या टॉप-5 हिंदी डब साउथ क्राईम थ्रिलर चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे आहे:

1.पोर थोजिल

जेव्हा जेव्हा सर्वोत्कृष्ट दक्षिण भारतीय क्राईम थ्रिलर्सचा उल्लेख होतो, तेव्हा 'पोरे थोझिल'चे नाव नेहमीच घेतले जाते. हा चित्रपट एका सीरियल किलरभोवती फिरतो. एका नवीन आणि भित्रा पोलीस अधिकाऱ्याला एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत मिळून खुनांची मालिका सोडवावी लागते. ही जोडी आणि त्यांचा तपास चित्रपटाला अत्यंत आकर्षक बनवतात. जसजसा तपास पुढे केला जातो, तसतसे पोलिसांना या हत्येशी संबंधित अनेक जुने पुरावे सापडतात. या चित्रपटात आर. सरथकुमार, अशोक सेल्वन आणि निखिला विमल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोर थोझिल हा चित्रपट सोनीलिव्हवर उपलब्ध आहे.

2. रत्शासन

जर तुम्हाला सायकॉलॉजिकल थ्रिलर्स आणि सिरियल किलरवरील चित्रपट आवडत असतील, तर रात्ससन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. विष्णू विशाल, अमला पॉल आणि सरवणन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात, एका पोलीस अधिकाऱ्याची कथा आहे जो एका भयानक हत्यांच्या मालिकेचा तपास करत असतो. आरोपीला पकडणे सोपे नसते आणि तपासादरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक धागेदोरे सापडतात. चित्रपटाची कथा, वातावरण आणि उत्कंठा जबरदस्त आहे. अनेक दृश्ये तुम्हाला शेवटपर्यंत पडद्याला खिळवून ठेवतात. तुम्ही 'रात्ससन' हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहू शकता.

3.'दृश्यम २'

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा 'दृश्यम २' हा एक क्राईम थ्रिलर असून, यात एक कुटुंब आपले जुने रहस्य जपण्याचा प्रयत्न करत आहे. पहिल्या चित्रपटाच्या पुढूनच या चित्रपटाची कथा सुरू होते. पोलीस पुन्हा एकदा त्या जुन्या प्रकरणाचा तपास सुरू करतात आणि सत्य लपवून ठेवण्याचे आव्हान त्या कुटुंबासमोर उभे राहते. या चित्रपटात अॅक्शनपेक्षा बुद्धीला चालना देणारे खेळ जास्त आहेत. कथानक अनेक वळणे घेते, ज्यात वरवर पाहता एक कौटुंबिक रहस्य उघड होते, पण नंतर कथानक वेगळेच वळण घेते. "दृश्यम २" अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

4.इरुध्रुवम'

"इरुध्रुवम" ही एक तमिळ क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. ज्यांना सस्पेन्स आवडतो त्यांच्यासाठी ही एक उत्तम निवड आहे. ही कथा व्हिक्टर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याभोवती फिरते, जो एका सीरियल किलरचा शोध घेत आहे. खुनांमागील रहस्ये आणि गुन्हेगाराने मागे सोडलेले पुरावे तपासाला अधिकच गुंतागुंतीचे बनवतात. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे तिचा तपासाचा पैलू. व्हिक्टर जसजसा या प्रकरणाचा अधिक तपास करतो, तसतसे हे प्रकरण त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी अधिकाधिक गुंतत जाते. "इरुध्रुवम" सोनीलिव्हवर पाहता येईल.

5.'हिट: द फर्स्ट केस'

"हिट: द फर्स्ट केस" ही एका बेपत्ता मुलीच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याबद्दलची एक गुन्हेगारी तपास थ्रिलर आहे. तपासादरम्यान, त्याला त्याच्या भूतकाळातील भीती आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. जसजसा तपास पुढे जातो, तसतसे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत जाते. एकामागून एक नवीन धागेदोरे समोर येतात आणि कथा प्रेक्षकांना सतत अंदाज बांधायला लावते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com