Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Taarak Mehta Ka Ooltah ChashmahSaam Tv

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: 'तारक मेहता...'मधील आवाजामुळे 'दयाबेन'ला झाला होता त्रास; मालिकेत पुन्हा परतणार का?

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून घराघरात पोहचलेल्या दयाबेनला तिच्या आवाजामुळे निर्माण होत आहेत समस्या.
Published on

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय मालिका (Program) आहे. या मालिकेतील दयाबेन हे पात्र देखील तितकेच प्रसिद्ध आहे. दिशा वकानी ही अभिनेत्री गेली अनेक वर्ष दयाबेनची भूमिका साकारत होती. मॅटर्निटी लिव्हवर गेल्यापासून दिशा या मालिकेपासून लांब आहे. दिशाने तिच्या भूमिकेविषयी सांगताना म्हटले होते की दयाबेनचा आवाज खूप विचित्र आहे आणि हे पात्र साकारत असताना माझ्या घशाला त्रास झाला होता. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या (TV Show) प्रेक्षकांना माहितच आहे की दिशाला दयाबेन हे पात्र साकारताना आवाज बदलावा लागतो.

दिशाने तिच्या दयाबेन या पात्राबद्दल अनेक किस्से सांगितले आहेत. एकेकाळी दिशा सर्वात जास्त मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री (TV Actress) होती. दिशाचे अनेक चाहते आहेत. दिशाचे अद्याप अधिकृत इंस्टाग्राम (Social Media) अकाऊंट तिने तयार केलेले नाही. परंतु तिच्या फॅन्सनी तिच्या नावाने अनेक इंस्टाग्राम अकाऊंट बनविले आहेत.

 Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
'Maja Ma' Movie Update: माधुरी दीक्षितच्या हिरोचा मोठा खुलासा: म्हणाला वाटलं नव्हतं असं होईल...

दिशा सांगते की, दयाबेन हे पात्र साकारताना तिच्या आवाजात बदल करावे लागतात. परंतु यामुळे तिला अद्यापही कोणतीही समस्या उद्भवली नाही. तिला हा आवाज सांभाळणे कठीण जाते. देवाची कृपा आहे अजून मला आवाजामुळे कोणताही त्रास झालेला नाही. आता मला या आवाजाची सवय झाली आहे. कारण सलग ११-१२ तास या आवाजात मी शूटिंग करत असते. दिशाने ही भूमिका साकारण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. सगळेजण तिच्या या भूमिकेचे कौतुक करत असतात.

सध्या दिशा वकानी मालिकेत येणार का? याविषयी बरीच चर्चा सुरू आहे. मालिकेचे निर्माते दिशाच्या सतत संपर्कात आहेत. 'तारक मेहता का उलटा चष्मा'चे प्रेक्षक सुद्धा दिशाला म्हणजेच दया बेनला मालिकेत पाहण्यास उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com