April May 99 : यंदाची उन्हाळ्याची सुट्टी होणार अविस्मरणीय; 'एप्रिल मे ९९' मध्ये 'जाई'ची खास एंट्री

April May 99 Marathi Movie: रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ चित्रपटातील तीन कलाकारांचे चेहरे समोर आले होते. आता या चित्रपटातील चौथ्या मैत्रीणची ओळख करुन देण्यात आली आहे.
April May 99
April May 99Saam Tv
Published On

April May 99 Marathi Movie: रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातील (कृष्णा) आर्यन मेंगजी, प्रसाद (श्रेयस थोरात) व (सिद्धेश) मंथन काणेकर हे त्रिकुट प्रेक्षकांसमोर आले. या तिघांची गाण्यातून, टीझरमधून सर्वांशी ओळख होत असतानाच एक पाठमोरा चेहरा यात सतत दिसत होता आणि हा चेहरा कोणाचा असेल, याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली होती. अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता हा चेहरा समोर आला आहे. तर हा चेहरा आहे कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांची मैत्रीण जाईचा. त्यामुळे आता ही गँग एकत्र आल्याने 'एप्रिल मे ९९' ची सुट्टी अविस्मरणीय ठरणार हे नक्की !

जाईची भूमिका साकारणारी साजिरी जोशी ही अभिनेत्री ऋजुता देशमुखची मुलगी असल्याने अभिनयाचा वारसा तिला आईकडूनच मिळाला आहे. ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. हुशार, समजुतदार, गोड, दिलखुलास अशी जाई या तीन मित्रांबरोबर उन्हाळ्याच्या सुट्टीत धमाल करताना दिसत आहे.

April May 99
Sagar Karande: सागर कारंडे फसवणूक प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाखांचा घोटाळा उघड

दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “काही वर्षांपूर्वी एका चित्रपटासाठी मी साजिरीची ऑडिशन घेतली होती. परंतु त्या व्यक्तिरेखेशी ती मिळतीजुळती नसल्याने तिची निवड झाली नाही. परंतु तिची निरागसता, कुरळे केस, बोलके डोळे, हावभाव माझ्या लक्षात राहिले. त्यामुळे हे माझ्या मनात होतेच, की जेव्हा मी एखादा चित्रपट बनवेन तेव्हा साजिरीला नक्की एखादी भूमिका देणार. 'एप्रिल मे ९९' बनवताना साजिरीलाच डोक्यात ठेवून 'जाई'ची व्यक्तिरेखा लिहिण्यात आली. तिच्या अभिनयात सहजता व नैसर्गिकता असल्याने जाई अनेकांना आपल्यातलीच एक वाटेल. कृष्णा, प्रसाद आणि सिद्धेश यांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले तशीच जाईही प्रेक्षकांना नक्कीच भावेल.''

April May 99
Aatli Baatmi Phutli: 'आतली बातमी फुटली' चित्रपटातून मोहन आगाशे आणि रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदा एकत्र; साकारणार खास भूमिका

मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत 'एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजेच १६ मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com