Deepika Chikhalia Slam Kriti Sanon-Om Raut : ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका म्हणजे रामसागर दिग्दर्शित 'रामायण'. रामायण ही मालिका अजूनही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. रामायण ही फक्त मालिका नव्हता तर तमाम भारतीयांच्या भावना या मालिकेशी जोडल्या गेल्या आहेत. रामायणावर आधारित आदिपुरूष हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटावरून वाद सुरू झाले आहेत. तर रामायण मालिकेतील सीता म्हणजेच दिपीका चिखलीया हिने आदिपुरुष या सिनेमाच्या वादावर वक्तव्य केलं आहे. रामायणावर आधारित ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कधी ट्रेलरमुळे तर कधी चित्रपटातील कलाकारांमुळे.
प्रभास, क्रिती सेनन, सैफ अली खान अशी मोठी स्टारकास्ट असलेला या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात असतानाच आता 'रामायण' या प्रसिद्ध मालिकेतील सीता म्हणजेच दिपीका चिखलीया हिने ओम राऊत आणि क्रिती सेनन यांच्या किसच्या वादावर वक्तव्य केलं आहे.
क्रिती आणि ओम राऊत
नुकतचं ओम राऊत आणि क्रिती यांच्या किस प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. आदिपुरुषची संपूर्ण टीम तिरुपतीला गेली होती. तिथे ओम राऊत आणि क्रितीने एकमेकांना किस करुन गुडबाय केले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल तुफान व्हायरल झाला. त्यावर अनेकांनी ओम आणि क्रिती यांच्ये हे कृत्य आवडले नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
दिपीका चिखलीयाने क्रिती आणि ओम राऊतवर केलं वक्तव्य
दिपीका ही एकेकाळची खूप लोकप्रिय अभिनेत्री हाती. लोक तिच्या सीता या भूमिकेवर अजूनही प्रेम करतात. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं होतं. दिपीका नुकतीच आजतकशी बोलताना म्हणाली,' आजच्या पिढीचा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की, कलाकार ना पात्र समजून घेत ना त्यामागच्या भावना.
त्यांच्यासाठी 'आदिपुरुष' हा फक्त एक चित्रपट आहे. ते या चित्रपटाशी अध्यातमाने जोडले गेले नाही. क्रिती ही आजच्या पिढीची अभिनेत्री आहे. आजच्या जमान्यात किस करणं, मिठी मारणे हे खूप सहजपणे केले जाते. क्रितीने कधीच स्वतःला सीता मानल नाही. मी सीता हे पात्र जगली आहे, जे कलाकार आता फक्त भूमिका समजून पाहतात. एकदा हा प्रकल्प पूर्ण झाला की ते विचार करत नाही'.
आम्हाला कधी कोणी मीठीही मारली नव्हती..
'आमच्याबद्दल बोलायचे तर त्यावेळी कोणाची एवढी हिम्मत नव्हती की आमचं नावही घेतील. जेव्हा आम्ही भूमिकेत असायचो तेव्हा तर लोक आमच्या पाया पडायचे. तो काळच वेगळा होता. लोक आम्हाला देव समजायचे.
किस करणं तर फार लांबची गोष्ट आहे, लोक आम्हाला मिठी पण मारत नव्हते. आदिपुरुषचे कलाकार चित्रपट रिलीजनंतर नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्थ होतील. तेव्हा ते या पात्रांना विसरतीलही. पण आम्हाला असं वागवायचे की जसं आम्ही लोक देवच आहोत. याच कारणाने आम्ही कधी असे काही केले नाही जेणेकरुन लोकांच्या भावना दुखावतील.' असं वक्तव्य दिपीका यांनी केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.