मोठी बातमी ! 'धर्मवीर' सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांच्या कारला अपघात

सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Producer Mangesh Desai car accident
Producer Mangesh Desai car accidentsaam tv
Published On: 

मुंबई : सिनेविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रदर्शीत झालेल्या धर्मवीर सिनेमानं (Dharmaveer Movie) राजकीय वर्तुळासह प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या सिनेमाचे कलाकार, दिग्दर्शक, निर्मात्यांच्या कामाचंही कौतुक करण्यात आलं. परंतु आता एक खळबळजनक घटना घडली आहे. 'धर्मवीर' सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई (Mangesh Desai Accident) यांच्या कारचा अपघात झाला आहे. सायन पनवेल महामार्गावर कोकण भवन येथे हा अपघात झाला असल्याचं समजते. सुदैवाने या अपघातात मंगेश देसाई व त्यांच्या कुटुंबियांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांच्या कारचं मोठं नुकसाना झालं आहे. मंगेश देसाई आपल्या कुटुंबियांसोबत कर्जतला जात होते. समोरच्या गाडीने अचानक ब्रेक मारल्याने सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com