Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'साठी बॉलिवूडमध्ये चढाओढ; ५० हून अधिक निर्मात्यांचे अर्ज

Operation Sindoor Movie: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या ऑपरेशनवर चित्रपट बनवण्यासाठी शीर्षक नोंदणी करण्यासाठी 50 हून अधिक निर्मात्यांचे अर्ज आले आहेत.
Operation Sindoor
Operation SindoorSaam tv
Published On

Operation Sindoor: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या कारवाईने बॉलिवूडमध्येही खळबळ उडाली आहे. या ऑपरेशनवर चित्रपट बनवण्यासाठी शीर्षक नोंदणी करण्यासाठी १५ स्टुडिओ आणि चित्रपट निर्माते स्पर्धा करत आहेत.

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या कारवाईनंतर बॉलिवूडमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'मिशन पहलगाम' या टायटलची नोंदणी करण्यासाठी निर्मात्यांची चढाओढ सुरू झाली आहे.

Operation Sindoor
Raid 2 Box Office Collection: भारत-पाकिस्तान तणावात 'रेड २' चा धुमाकूळ; आठव्या दिवशी केला इतक्या कोटींचा गल्ला

बॉलीवूड हंगामाच्या अहवालानुसार, महावीर जैन यांच्या कंपनीने ऑपरेशन सिंदूर हे शीर्षक नोंदवणारी पहिली कंपनी होती. यानंतर, टी-सीरीज, झी स्टुडिओ सारखे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि अशोक पंडित, जिओ स्टुडिओ देखील या शर्यतीत सामील झाले.

Operation Sindoor
India Pakistan Digital Strike: भारत सरकारचा डिजिटल स्टाईक; पाकिस्तानच्या या OTT कंटेंटवर बंदीचा निर्णय

फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) चे अध्यक्ष बी.एन. तिवारी म्हणाले की, १५ हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत आणि लवकरच शीर्षकाचा निर्णय घेतला जाईल. ही शर्यत बॉलीवूडच्या परंपरेचे प्रतिबिंब आहे. बॉलिवूडमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या घटनांनंतर शीर्षकांची नोंदणी करण्यात आली होती. उदाहरणार्थ, २०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटाच्या यशानंतर 'पुलवामा', 'बालाकोट', 'सर्जिकल स्ट्राइक २.०' यांसारख्या शीर्षकांची नोंदणी करण्यात आली होती .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com