Chhaya Kadam: मराठमोळ्या छायाची आणखी एक गगनझेप; पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवलमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार!

Chhaya Kadam Award : छाया कदमच्या स्नो फ्लॉवर या चित्रपटासाठी तिला पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे.
chhaya kadam
chhaya kadamSaam Tv
Published On

Chhaya Kadam: मागच्या वर्षी पासून जिने लागोपाठ पुरस्कार सोहळ्यात मनाचे पुरस्कार मिळवले अशी अष्टपैलू हरहुन्नरी अभिनेत्री छाया कदमने अजून एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. छाया कदमच्या स्नो फ्लॉवर या चित्रपटासाठी तिला पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे.

काही दिवसांपासून सुरू असलेल्या पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये वैविध्यपूर्ण चित्रपटाचं स्क्रिनिंग, कलाकार-दिग्दर्शक यांच्या चर्चा होताना सगळ्यांनी पाहिल्या आणि पुणे इंटरॅशनल फिल्म फेस्टीवल मध्ये हा खास पुरस्कार सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात छाया कदमला स्नो फ्लॉवर साठी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा खास पुरस्कार प्राप्त झाला आहे.

chhaya kadam
Navri Mile Hitlerla: काश्मीरमध्ये खुलणार एजे लीलाच प्रेमळ नातं; हटके स्टाईलमध्ये करणार प्रपोज

छाया कदमच्या पुरस्कारांचा हा सिलसिला असाच सुरू असून येणाऱ्या काळात छाया अनेक प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहे. छायाने आजवर अनेक दमदार भूमिका छाया कदम साकारल्या आहेत. तिच्या कामाची पोचपावती म्हणून हा अजून एक महत्त्वपूर्ण पुरस्कार तिने पटकावला आहे.

chhaya kadam
Riteish - Genelia: लग्न म्हणजे काय; जेनिलिया वहिनीच्या प्रश्नावर रितेश भाऊचे भन्नाट उत्तर, व्हिडीओ तुफान व्हायरल

यावर्षी छायाचा लपता लेडीज हा चित्रपट ऑस्करसाठी भारतातंतून पाठवण्यात आला होता. तसेच मागीलवर्षी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर तिच्या ऑल वी इमॅजिन एस ए लाईट या चित्रपटाचेहि कौतुक करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com