Big Breaking : आर्यन खानचा आजचा मुक्काम जेलमध्ये; उद्या सुनावणी

आर्यनला पकडण्याचा अधिकारचं एनसीबीला नाही - मुकुल रोहितगी
आर्यन खान
आर्यन खानSaam Tv
Published On

मुंबई: अवघ्या देशाचं लक्ष लागून राहीलेल्या आर्यनच्या जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनवाणी झाली. यावेळी आर्यनच्या वतीने प्रसिध्द वकिल मुकुल रोहितगी यांनी युक्तिवाद केला. मात्र आर्यन खानचा आजचा मुक्काम जेलमध्ये असणार असल्याचं उघड झाले आहे.

आर्यन खान अटक ते जामीन अर्ज निकाल टाईम लाईन

२ ऑक्टोबरला शनिवारी कॉर्डिला क्रूझवर एनसीबीची धाड टाकली. 3 ऑक्टोबरला आर्यनला अमली पदार्थ कायद्याखाली अटक आणि सुट्टीकालीन दंडाधिकारी कोर्टाने 4 ऑक्टोबरपर्यंत पहिली रिमांड दिली. 4 ऑक्टोबरला पुढील तपासासाठी एनसीबीला नियमित कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत रिमांड दिली.

7 ऑक्टोबरला मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टाने आर्यनला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आर्यन खानची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. कोरोनाकाळातील नियमाप्रमाणे आठवड्याभरासाठी विलगीकरण कक्षात त्याला ठेवण्यात आले. न्यायालयीन कोठडी मिळताच आर्यनच्या जामिनाची याचिका सादर करण्यात आली. त्यानंतर 8 ऑक्टोबरला जामीनावर सुनावणी झाली, मात्र एनसीबीने त्यावर आक्षेप घेतला. मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्ट आर्यन जामिनावर सुनावणी करू शकत नाही त्यांच्या कार्यक्षेबाहेरील हे प्रकरण असल्याचा दावाएनसीबीने केला आहे. हा दावा मान्य करत आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

आर्यन खान
धोरणात्मक बाबींवर राज्यातील नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही; सोनिया गांधींनी पक्ष नेत्यांना फटकारले

9-10 ऑक्टोबर शनिवार रविवार असल्याने कोर्ट बंद होते. 11 ऑक्टोबरला जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात सादर करण्यात आला. त्यानंतर एनसीबीने अपेक्षेप्रमाणे उत्तर देण्यासाठी आठवड्याचा अवधी मागितला, मात्र एनसीबीला बुधवारपर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाकडून निर्देश दिले होते. 12 ऑक्टोबर रोजी कोर्टात काहीही कारवाई झाली नाही. 13 ऑक्टोबर जामीनावर सुनावणी झाली. 14 ऑक्टोबरला जामीनावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर 20 ऑक्टोबरला न्यायलायने निकाल राखून ठेवला.15 ते 19 ऑक्टोबर कोर्ट सणासुदीच्यानित्तानं बंद होते. त्यानंतर अखेरीस आज न्यायालय आर्यन खानच्या जामीन अर्जावर निकाल देणार आहे. त्यानंतर २० ऑक्टोबरला विशेष एनडीपीएस न्यायालयाचे व्हि व्हि पाटील न्यायमूर्तींनी जामीन नाकारला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com