Aryan Khan: कार्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या 'क्लिन चीट' ला आव्हान देणारी फौजदारी जनहित याचिका बुधवारी मुंबई उच्च न्यायलयाने मागे घेतली आहे. मुख्य न्यायमुर्ती एस.व्ही. गांगापूरवाला यांनी या प्रकरणाला 'प्रसिद्धी याचिका' असे म्हटले आहे.
याचिका कर्त्याचे या प्रकरणासोबत कोणताही संबंध नसतानाही याचिका कशी दाखल केली गेली, असा सवाल याचिका कर्त्यावर उपस्थित करत, त्याला आता मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
त्यानंतर याचिकाकर्ता प्रीतम देसाई याच्या बाजूने अधिवक्ता सुबोध पाठक यांनी याचिका मागे घेतली आहे. प्रीतम देसाई यांच्या या प्रकरणात अधिवक्ता पाठक यांना केवळ न्यायालयाकडून क्लीन चिट मिळू शकते.
एसआयटीने फक्त पुरावे रेकॉर्डवर ठेवले पाहिजेत आणि कोर्टाला निर्णय द्यावा. सोबतच या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आर्यन खानला निर्दोष मुक्त करण्यात आल्याचे खंडपीठाचे मत होते. शिवाय, कायदा अभ्यासक म्हणून देसाई यांनी आणखी महत्त्वाच्या कारणांचा पाठपुरावा केला पाहिजे, असे ते म्हणाले.
एसआयटीने या वर्षाच्या सुरुवातीला आपल्या चार्जशीटमध्ये आर्यन खान, अवीन साहू, गोपाल आनंद, समीर सहगल, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल यांना ड्रग्ज प्रकरणासंबंधित क्लीन चिट दिली होती. 20 आरोपींपैकी 14 जणांवर नार्कोटिक्स ड्रग्ज अॅंड सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायदा, १९८५ (Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act. 1985) च्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
नक्की काय होतं प्रकरण...
आर्यन खानला गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर 2021 रोजी ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती, त्याच्याकडे कोणतेही ड्रग्ज मिळाले नव्हते, तर त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्याकडे 6 ग्रॅम चरस आढळून आला होता. मुनमुन धमेचा याच्याकडून आणखी 5 ग्रॅम चरस जप्त करण्यात आल्याची माहितीही एनसीबीने दिली होती.
त्याच्यावर नार्कोटिक्स ड्रग्ज अॅंड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यांतर्गत (Narcotic Drugs and Psychotropic Substances (NDPS) Act. 1985) कलम 8(सी), 20(बी), 27, 28, 29 आणि 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.