
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन
पंकज धीर यांची कॅन्सरसोबतची झुंज अपयशी ठरली
त्यांनी ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची भूमिका साकारली होती
६८ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला
बॉलिवूडमधून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. मुंबईमध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पंकज धीर यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूडसह टीव्ही इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पंकज धीर यांना कॅन्सर झाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते पण ती अपयशी ठरली. मुंबईमध्ये त्यांचे निधन झाले. पंकज धीर यांच्या जवळचे मित्र अमित बहल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताबद्दल सांगितले. पंकज धीर यांनी बीआर चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये कर्ण हे पात्र साकारले होते. या मालिकेच्या माध्यमातून ते घराघरामध्ये पोहचले आणि त्यांना खूप चांगली प्रसिद्धी मिळाली. त्यांनी बॉलिवूडचे अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते.
पंकज धीर यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला. त्यातून ते बरे देखील झाले होते. पण काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सर झाला. त्यानंतर त्यांची प्रकृती खूपच खालावली. त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील झाली होती आणि रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची प्रकृती खूपच बिघडत गेली आणि ते हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार आणि त्यांचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
पंकज धीर यांनी टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत एकापेक्षा एक जबरदस्त प्रोजेक्टमध्ये काम केले होते. पण १९८८ मध्ये आलेल्या 'महाभारत' या मालिकेतून त्यांना प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. पंकज धीर यांनी मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 'चंद्रकांता', 'द ग्रेट मराठा' या मालिकांमध्ये त्यांनी काम केले. त्याचसोबत 'सोल्जर', 'बादशाह', 'सडक' या चित्रपटात त्यांनी काम केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.