The Sabarmati Report: देशाला हादरवून सोडणारी घटना..., विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा धमाकेदार टीझर रिलीज

The Sabarmati Report Teaser Out: विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर आऊट झाला.
The Sabarmati Report Teaser Out
The Sabarmati Report Teaser OutSaam Tv

The Sabarmati Report Movie:

'१२वी फेल' (12th Fail) चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) चांगलाच चर्चेत आहे. विक्रांतचा हा चित्रपट सुपरहिट ठरला असून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटातील विक्रांत मेस्सीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. या चित्रपटानंतर आता विक्रांत मेस्सी 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर आऊट झाला.

एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटात अभिनेता विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना मुख्य भूमिकेमध्ये आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राशी खन्ना आणि विक्रांत मेस्सी ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. त्यांच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

'द साबरमती रिपोर्ट'च्या टीझरमध्ये पहिल्याच फ्रेमपासून विक्रांत आणि राशी पत्रकार म्हणून त्यांच्या कामगिरीने प्रभाव पाडतात. विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोगरा हे तिघे जण मिळून या घटनेमागचे सत्य बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. या चित्रपटाचा टीझर खूपच जबरदस्त आहे. विक्रांत मेस्सीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'देशाला हादरवून सोडणारी घटना. भारतीय इतिहास कायमचा बदलून टाकणारी घटना.'

The Sabarmati Report Teaser Out
Aditi Rao Hydari: आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांचं खरंच लग्न झालं का?, अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत सांगितलं सत्य

दरम्यान, एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. २७ फेब्रुवारी २००२ रोजी गुजरात राज्यामध्ये झालेल्या गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या भीषण घटनेवर आधारित या चित्रपटाची कथा आहे. चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रंजन चंदेल दिग्दर्शित हा चित्रपट ३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

The Sabarmati Report Teaser Out
[Watch] Amar Singh Chamkila Trailer: 'अमर सिंग चमकीला'चा जबरदस्त ट्रेलर एकदा पाहाच, परिणीती- दिलजीतनं 'दिल' जिंकलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com