Shreya Ghoshal Birthday: १६व्या वर्षी गायलं करिअरमधलं पहिलं गाणं, श्रेया घोषालच्या नावाने अमेरिकेत साजरा केला जातो खास दिवस

Shreya Ghoshal Bday: श्रेया घोषाल आपला ४० वा वाढदिवस (Shreya Ghoshl Birthday) साजरा करत आहे. श्रेयाच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या करिअरविषयी जाणून घेणार आहोत...
Shreya Ghoshal Bday
Shreya Ghoshal BdaySaam Tv
Published On

Shreya Ghoshal Career:

बॉलिवूडची (Bollywood) लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल (Shreya Ghoshl) आपल्या आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करते. श्रेया घोषालने अगदी लहान वयातच खूप चांगली प्रसिद्धी मिळवली. वयाच्या ६ व्या वर्षी श्रेया घोषालने पहिला स्टेज शो केला. श्रेया घोषाल आपल्या मधूर आवाजाच्या माध्यामातून रसिकांच्या मनावर जादू करते. आज श्रेया घोषाल आपला ४० वा वाढदिवस (Shreya Ghoshl Birthday) साजरा करत आहे. श्रेयाच्या वाढदिवसानिमित्त आज आपण तिच्या करिअरविषयी जाणून घेणार आहोत...

श्रेया घोषालचा जन्म 12 मार्च 1984 रोजी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमधील बेहरामपूरमध्ये झाला. श्रेया घोषालने आईकडून संगीताचे धडे घेतले. श्रेयाची पहिली गुरू तिची आई आहे. वयाच्या ६ व्या वर्षी श्रेयाने पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला. लहानपणापासूनच श्रेयाचे गायिका व्हायचे स्वप्न होतं. वयाच्या चौथ्या वर्षापासून तिने संगीताचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.

श्रेया घोषालला टीव्हीच्या प्रसिद्ध सिंगिंग रिॲलिटी शो 'सारेगामापा'मधून मोठी संधी मिळाली. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. श्रेयाने 'सारेगमपा' या रिॲलिटी शोमध्ये दुसऱ्यांदा भाग घेतला तेव्हा तिच्या शानदार परफॉर्मन्सने सर्वांची मनं जिंकली. हीच वेळ होती जेव्हा श्रेयाचा आवाज संजय लीला भन्साळींनी ऐकला आणि गायिकेचे नशीब पालटलं.

श्रेया घोषाल रियालिटी शो सारेगामापामुळे चर्चेत आली. या शोची ती विनर ठरली होती. या शोमध्ये श्रेया घोषालचा आवाज ऐकून दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांची आई तिची फॅन झाली होती. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा संजय लीला भन्साळीला श्रेया घोषालला चित्रपटामध्ये संधी देण्यास सांगितले. आपल्या आईच्या सांगण्यावरून संजय लीला भन्सालीनी 'देवदास' चित्रपटामध्ये श्रेयाला गाणं गाण्याची संधी दिली. या चित्रपटात तिने 5 गाणी गायली. ही सर्व गाणी सुपरहिट ठरली. या चित्रपटासाठी श्रेयाने पहिला नॅशनल अवॉर्ड जिंकला.

श्रेया घोषालने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. आतापर्यंत श्रेयाने 200 हून अधिक चित्रपटांच्या गाण्यांना आवाज दिला आहे. श्रेया घोषालने 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आजही 26 जून हा दिवस अमेरिकेच्या 'ओहायो' राज्यात श्रेयाच्या नावाने 'श्रेया घोषाल दिवस' म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 25 जून रोजी अमेरिकेतील ओहायोमध्ये श्रेया घोषाल नावाचा दिवस साजरा केला जातो. 2010 च्या उन्हाळ्यामध्ये जेव्हा श्रेया घोषाल अमेरिकेत गेली होती. तेव्हा ओहायोचे गव्हर्नर टेड स्ट्रिकलँड यांनी घोषणा केली होती की आता हा दिवस श्रेया घोषाल दिवस म्हणून साजरा केला जाईल. तेव्हापासून, ओहायोमध्ये दरवर्षी 25 जून रोजी श्रेया दिवस साजरा केला जातो.

Shreya Ghoshal Bday
चाळीशी लागलेल्या डोळ्यांत जेव्हा फुलतात विशीतली स्वप्नं..., 'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर'मधील पहिलं गाणं आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com