Jaya Bachchan: ...म्हणून जया बच्चन सोशल मीडियापासून राहतात दूर, अभिनेत्रीने स्वत:च केला खुलासा
What The Hell Navya:
बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) या नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन या कोणत्याही मुद्द्यावर स्पष्टपणे बोलतात. त्या सोशल मीडिया (Social Media) वापरत नसल्या तरी देखील त्या आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. सध्या जया बच्चन या नात नव्या नवेली नंदाच्या (Navya Naveli Nanda) पॉडकास्ट शो 'व्हाट द हेल नव्या सीजन 2' (What the Hell Navya Season 2) सहभागी झाल्या आहेत. या शोचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये जया बच्चन यांनी सोशल मीडियापासून का दूर आहेत? यामागचे कारण सांगितले आहे.
नव्या नवेली नंदा तिचा पॉडकास्ट शो'व्हॉट द हेल नव्या' मध्ये आजी आणि आईसोबत अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसत आहेत. या शोमध्ये नव्याने आजीला सोशल मीडियापासून दूर का असते? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना जया बच्चन सांगितात की, 'जगाला आधीपासूनच आमच्या कुटुंबाविषयी सगळं काही माहिती आहे. त्यामुळे आम्हाला इन्स्टाग्रामवर काही शेअर करण्याची गरज वाटत नाही.'
या शोच्या प्रोमोमध्ये जया बच्चन या टेक्नॉलॉजिबद्दल देखील बोलताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये जया बच्चन म्हणतात की, 'मी लहान असताना आम्हाला कॉल्स बुक करावे लागायचे. त्यावेळी दोन प्रकारचे कॉल होते. एक नॉर्मल आणि दुसरा इमर्जन्सी कॉल. जर तुम्हाला तुमच्या प्रियकराशी बोलण्याची गरज असेल तर ते इमर्जन्सी कॉल करायचे.' जया बच्चन यांची मुलगी आणि नव्याची आई श्वेता नंदा देखील 'व्हॉट द हेल नव्या सीझन 2' मध्ये बोलताना दिसली. या शोच्या प्रोमोमध्ये श्वेता म्हणते की, 'जेव्हा आम्ही मोठे होत होतो तेव्हा आमच्याकडे इंटरनेट असते तर आमचा होमवर्क आणि इतर अनेक गोष्टी सोप्या झाल्या असत्या.'
पहिल्या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी ट्रोलर्सची चांगली शाळा घेतली होती. हिंमत असेल तर समोर येऊन बोला असे आव्हान तिने केले होते. तसंच 'तुम्हाला काही बोलायचे असेल तर सकारात्मक बोला. पण नाही तुम्हाला फक्त तुमचा निर्णय द्यायाचा असतो.' इतकंच नाही तर, जेव्हा नव्या म्हणते की, यापैकी बहुतेक सोशल मीडिया ट्रोलर्स तुमच्या समोर बसले तर त्यांची बोलण्याची हिंमतही होणार नाही. तेव्हा जया बच्चन म्हणतात की, 'त्यांच्यात हिंमत नाही. तुम्ही खरोखर धाडसी असाल तर खऱ्या मुद्द्यांवर टिप्पणी करा आणि तुमचा चेहरा दाखवा.'
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.