
बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्रीचा (vivek agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाने नवी ओळख मिळाली. त्यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्यांचा हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यामुळे या चित्रपटाच्या निर्मात्याकडून समीक्षक आणि चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या.
त्यानंतर विवेक अग्निहोत्री 'द वॅक्सिन वॉर' (The Vaccine War) हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्यांचा हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला खरा. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.
अशामध्येच विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विवेक अग्निहोत्री आता 'पर्व' चित्रपट (Parva Movie) घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबाबत अलीकडेच अपडेट्स समोर आली आहेत. या चित्रपटाची कथा एसएल भैरप्पा यांच्या 'पर्व' या पुस्तकावर आधारित असणार आहे. 'पर्व' चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर त्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत. या चित्रपटाबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.
'द कश्मीर फाइल्स'ने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून देणारे चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केलीये. विवेक अग्निहोत्रीचा 'पर्व' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एसएल भैरप्पा यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट असणार आहे. कन्नड भाषेतील हे पुस्तक महाभारताची कथा एका नव्या पद्धतीने सांगते. या चित्रपटात तुम्हाला महाभारतातील पात्रांची कथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेनंतर प्रेक्षक खूपच खूश झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
महाभारतावर आधारित या चित्रपटाचे कामही सुरू झाले आहे. एसएल भैरप्पा यांची कादंबरी लोकांना खूप आवडली होती आता या कादंबरीवर आधारित चित्रपट येणार असल्यामुळे सर्वजण आनंदीत झाले आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. विवेक अग्निहोत्रीने 'पर्व' हा चित्रपट एक-दोन नव्हे तर तीन भागामध्ये आणण्याची तयारी केली आहे. विवेक अग्निहोत्रीच्या चित्रपटाच्या घोषणेवर सोशल मीडियावर यूजर्स त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. विवेक अग्निहोत्रीने यापूर्वी 'द काश्मीर फाइल्स' आणि 'द ताश्कंद फाइल्स' सारखे चित्रपट तयार केले आहेत. जे प्रेक्षकांना खूप आवडले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.