
बुलेट प्रुफ कार, बुलेट प्रुफ घर असून देखिल बॉलीवुडचा भाईजान चिंतेत आहे.. सिंकदरच्या यशानंतर जसं सलमानच्या अभिनयावर चाहत्यांनी वर्षाव केलाय. तसाच आता त्याच्यावर धमक्यांचा वर्षाव होतोय अशी स्थिती सध्या दिसतेय.. पाहुयात कोणी कसं धमकावलं भाईजानला.
सलमान खान. बॉलिवूडचा लाडका भाईजान, मात्र सध्या भाईजानचचं टेन्शन वाढवलय. सिंकदर आल्यानं सलमानचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतांना आता मात्र त्याला आलेल्या धमकीनं पुन्हा टेन्शन वाढलंय. कारण पुन्हा सलमान खानला घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.
तसंच त्याची कार बॉम्बने उडवून देण्याचीही धमकी मुंबईच्या वरळीतील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअपवर आलीये. त्यामुळे पोलिस अलर्ट झालेत तसंच याप्रकऱणी अज्ञाताच्या विरोधात तक्रार दाखल करुन तपास सुरु झालाय. सलमान खानला आतापर्यंत कितीवेळा धमकी देण्यात आली पाहुयात.
2018 मध्ये लॉरेन्स बिश्नोईची जोधपूर कोर्टात जीवे मारण्याची धमकी
जून 2022 मध्ये सलीम खान यांना सलमानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र
मार्च 2023 मध्ये सलमानच्या कार्यालयात गोल्डी ब्रारच्या नावाने धमकीचा ईमेल
ऑक्टोबर 2024मध्ये 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बिश्नोईच्या नावाने धमकी
एप्रिल 2024 मध्ये सलमानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार
नोव्हेंबर 2024 मध्ये 2 कोटी रुपये खंडणी मागत धमकी
नोव्हेंबर 2024मध्ये सलमानच्या पनवेलच्या फार्म हाऊसवर अज्ञातांचा घुसखोरीचा प्रयत्न
एप्रिल 2025 रोजी सलमानच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची आणि घरात घुसून मारण्याची धमकी
आतापर्यंत सलमान खानला सात - आठ वेळा धमकावण्यात आलंय. त्यानंतर पोलिसांनी त्याची सुरक्षा वाढवली. सलमान खाननं देखील बुलेटप्रुफ कारसोबत घराच्या काचाही बुलेट प्रूफ करुन घेतल्या. सुरक्षेची प्रचंड काळजी घेऊन सध्या सलमान भितीच्या छायेत जगतोय असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. काही दिवसांपुर्वी वैफल्यग्रस्त होऊन त्यानं य़ा धमक्यांवर प्रतिक्रियाही दिली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.