KKBKKJ 2nd Day Collection: ईद चांगली झाली.. ! पहिल्याच दिवशी फ्लॉप ठरलेला KKBKKJ दुसऱ्या दिवशी जोमात; ईदच्या दिवशी भरघोस कमाई...

ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे, हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.
KKBKKJ 2nd Day Box Office Collection
KKBKKJ 2nd Day Box Office CollectionSaam Tv
Published On

KKBKKJ 2nd Day Box Office Collection: सलमान खानचा २१ एप्रिलला प्रदर्शित झालेला ‘किसी की भाई किसी की जान’ सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दिलासादायक कमाई केलेली नाही. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी किती कमाई केली आहे, हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

ईदच्या दिवशी सलमानच्या चित्रपटाने कशी कमाई केली आहे, याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहे. सलमानच्या ‘भारत’ चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३१ कोटींची कमाई केली होती, मात्र ‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग पाहता पहिल्या दिवशी चित्रपटाने २० कोटींचा देखील आकडा पार केला आहे.

KKBKKJ 2nd Day Box Office Collection
Singham 3 Release Date Out: 'सिंघम 3' च्या रिलीज डेटची घोषणा! अजय देवगणसह दीपिकाही दिसणार पोलिसांच्या गणवेशात

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी की भाई किसी की जान’ चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जेमतेम १४ कोटींची कमाई केली होती. वीकेंड आणि ईदच्या सुट्टीमुळे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन जबरदस्त होईल, अशी अपेक्षा होती. सैकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने दुस-या दिवशी बॉक्स ऑफिसवर २५ कोटींची कमाई केली आहे.

KKBKKJ 2nd Day Box Office Collection
Posts Of Marathi Celebrities About World Earth Day: वसुंधरा दिनी आई कुठे काय करते फेम अभिनेत्रीचे आवाहन; प्रदुषण रोखण्याचे सांगितले १०१ रामबाण उपाय

ईदच्या दिवशी चित्रपटाने पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत दिलासादायक कमाई केली आहे. यावरून भाईजानची क्रेझ सर्वांना स्पष्टपणे दिसून येत आहे. तरण आदर्शच्या मते, सलमानच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.81 कोटींची कमाई केली.

सलमान खानच्या ‘किसी की भाई किसी की जान’मध्ये अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, सिद्धार्थ निगम, पलक तिवारी आणि विनाली भटनागर, व्यंकटेश, राघव जुयाल आणि जस्सी गिल हे सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com