आर्यन खानला पाठिंबा देऊन बाॅलीवूड चुकीचा संदेश देतंय???

बाॅलीवूडचा आर्यन खानला पाठिंबा
बाॅलीवूडचा आर्यन खानला पाठिंबा- Saam Tv
Published On

मुंबई : बाॅलिवूडचा किंग खान शाहरूखचा मुलगा आर्यन खानला ड्रगस प्रकरणात Ncb ने अटक केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा बाॅलीवडूचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. असे असूनही सिनेसृष्टी मात्र किंग खानच्या पाठीशी उभी आहे असंच दिसतं.

आज सकाळी सोशल मिडियावर अभिनेता ह्रितिक यांनी आर्यन खानसाठी एक खास पत्र पोस्ट केलं. त्यात त्यानं आर्यनला आयुष्याबाबत उपदेश केलाय. पण त्यानंतर हृतिक सोशल मिडियावर चांगलाच ट्रोल व्हायला लागलाय. आर्यनच्या ड्रग्ज घेण्याला तू संघर्ष कसा म्हणू शकतो, असा खडा सवाल ट्रोलर्सनी केलाय.

बाॅलीवूडचा आर्यन खानला पाठिंबा
आर्यन खानवरील कारवाई संशयास्पद; छगन भुजबळांचा गंभीर आरोप!

यापूर्वीही अनेक कलाकारांनी आपण किंग खानसोबत आहोत, असं जाहीरपणे सांगितलं आहे. गायक मिका सिंगनही आर्यन खानबाबत एक पोस्ट केली आहे. 'इतने बडे क्रुझमें सिर्फ आर्यन खानही घूम रहा था क्या..' असा सवाल मिका सिंगनं विचारलाय. आर्यन खानला पाठिंबा दिल्यानं बाॅलीवूडचा चुकीचा चेहरा चाहत्यांसमोर येत नाहीये ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातो.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com