Rubina Dilaik: 'संस्कारी बहू'चा सोशल मीडियावर कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज पाहिलात का?

नुकतेच तिने आपल्या चाहत्यांसोबत एक हटके फोटोशूट केले असून सर्वांच्याच त्यावर नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
Rubina Dilaik Viral Photo
Rubina Dilaik Viral Photo Instagram/ @rubinadilaik
Published On

Rubina Dilaik: 'खतरों के खिलाडी सीझन 12', 'बिग बॉस सीझन 14' सारख्या प्रसिद्ध रिॲलिटी शोमधून प्रसिद्ध झालेली टेलिव्हिजन अभिनेत्री रुबिना दिलैक सध्या कमालीची प्रकाशझोतात आली आहे. तिने 'बिग बॉस सीझन 14'चं विजेतेपदही पटकावले होते. नेहमीच रुबिना सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच तिने आपल्या चाहत्यांसोबत एक हटके फोटोशूट केले असून सर्वांच्याच त्यावर नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.

Rubina Dilaik Viral Photo
आई म्हणजे काय? सांगणाऱ्या Mrs Chatterjee Vs Norwayचा ट्रेलर प्रदर्शित, थरारक ट्रेलर पाहून डोळ्यात येईल पाणी

चाहत्यांमध्ये संस्कारी बहू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या रुबिनाने नुकतेच हटके फोटोशूट केले आहे. फोटोशूटदरम्यान रुबिना दिलैकने बारीक खड्यांचा 2 पीस ड्रेस परिधान केला आहे. या अवतारात रुबीना बरीच ग्लॅमरस दिसत आहे. रुबिनाच्या या फोटोंना काही वेळातच लाखो लाईक्स मिळाले आहेत. रुबिना दिलैकने 2008 मध्ये टीव्ही सीरियल 'छोटी बहू: सिंदूर बिन सुहागन'मधून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती.

Rubina Dilaik Viral Photo
Disha Patani: "ॲक्टिंग सोडून सगळं काही येतं..." दिशाचा बोल्ड अवतार बघून फॅनची भन्नाट प्रतिक्रिया

त्यानंतर, रुबिनाने पुनर्विवाह, जिनी और जीजू आणि देवों के देव सारख्या हिट टीव्ही मालिकांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवले. याशिवाय ती टीव्ही मालिका 'शक्ती: अस्तित्व के एहसास की' मालिकेत मुख्य भूमिकेत दिसली होती. सध्या रुबिना कोणत्याही टीव्ही सीरियलमध्ये नसून गेल्या वर्षी तिने चित्रपटसृष्टीत कमबॅक केले होते. यामध्ये रुबिना राजपाल यादवसोबत दिसली होती. तो कार्यक्रम Zee5 वर प्रवाहित केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com