आई म्हणजे काय? सांगणाऱ्या Mrs Chatterjee Vs Norwayचा ट्रेलर प्रदर्शित, थरारक ट्रेलर पाहून डोळ्यात येईल पाणी

राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर आज सोशल मीडियावर प्रदर्शित आहे.
Mrs Chatterjee Vs Norway
Mrs Chatterjee Vs NorwaySaam Tv
Published On

Mrs Chatterjee Vs Norway Trailer Out: बॉलिवूडची खंडाला गर्ल राणी मुखर्जी गेल्या अनेक दिवस चित्रपटसृष्टीपासून काही काळ लांब होती. तिच्या आगामी चित्रपटाची चाहते फारच आतुरतेने वाट पाहत होते. मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे (Mrs Chatterjee Vs Norway) या चित्रपटातून चाहत्यांची मने जिंकणार आहे. नुकतच राणी मुखर्जी प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाचा ट्रेलर आज सोशल मीडियावर प्रदर्शित आहे.

Mrs Chatterjee Vs Norway
Disha Patani: "ॲक्टिंग सोडून सगळं काही येतं..." दिशाचा बोल्ड अवतार बघून फॅनची भन्नाट प्रतिक्रिया

आशिमा छिब्बर दिग्दर्शित चित्रपटाची कथा वास्तववादी असून सोशल मीडियावर चित्रपटाच्या ट्रेलरची बरीच चर्चा होत आहे. राणीने पुन्हा एकदा आपल्या उत्तम अभिनयाने सर्वांचेच मन जिंकले आहे. यावेळी राणी एका गृहिणीची भूमिका साकारणार आहे. जी आपल्या मुलांसाठी नॉर्वेजियन सरकार विरोधात लढताना दिसत आहे.

Mrs Chatterjee Vs Norway
Welcome 3 Cast: 'वेलकम 3'ची कास्टच बदलली; मुन्नाभाई-सर्किटची होणार चित्रपटात एन्ट्री

शेअर करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये मिसेस चॅटर्जीपासून सुरुवात होते. ती कोलकात्यातून नॉर्वेमध्ये आपल्या परिवारासोबत राहायला येते. तिच्या आयुष्यात सर्वकाही आलबेल सुरु असतं. पण, अचानक तिच्या मुलांना कायद्याच्या नावाखाली त्यांना हिरावून घेतले जाते. भारतीय संस्कृतीनुसार मिसेस चॅटर्जी आपल्या मुलांचा सांभाळ करत असल्याने तिला नॉर्वे सरकारने एक चांगली आई नसल्याचे घोषित केले. यानंतर मिसेस चॅटर्जीचा आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठीचा लढा सुरू होतो आणि ती आई म्हणून संपूर्ण देशाविरुद्ध उभी राहते.

Mrs Chatterjee Vs Norway
Karan Johar Show: कंगनानंतर आता जॉनची करणवर टीका; म्हणाला नेहमी 'खानच' का?

मिसेस चॅटर्जी Vs नॉर्वे 17 मार्च ला रिलीज होणार आहे. या सिनेमात राणी मुखर्जी शिवाय जिम सरभ, नीना गुप्ता आणि अनिर्बन भट्टाचार्य मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन आशिमा छिब्बर यांनी केले आहे. राणी मुखर्जीचा आणखी एक सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होणार यात शंका नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com