OTT Movie Release: तापसीचा 'ब्लर' सिनेमा थिएटरमध्ये येणार नाही, ओटीटीवर होणार प्रदर्शित

अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'ब्लर' पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत.
Taapsee Pannu New Movie OTT Release
Taapsee Pannu New Movie OTT Release Saam Tv

Taapsee Pannu Upcoming Movie: तापसी पन्नू नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिचे चित्रपटाचे विषय प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करतात. तापसीने तिच्या अभिनयाने स्वतःला सिद्ध केले आहे आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

तापसीच्या चित्रपटांची नेहमीच प्रेक्षकांना उत्सुकता असते. तापसीचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. परंतु हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये न येता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

Taapsee Pannu New Movie OTT Release
Janhavi Kapoor: जान्हवीची धर्मा प्रॉडक्शनवरुन ट्रोलिंग, करणच्या चित्रपटात काम केल्याचा मनस्ताप ?

अभिनेत्री तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'ब्लर' पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहेत. तसेच हा चित्रपट 'झी5' या ओटीटीवर प्लॅटफॉर्म दिसणार आहे. ९ डिसेंबर हा चित्रपट 'झी 5' वर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता गुलशन देवय्या देखील आपल्याला दिसणार आहे.

'ब्लर'चे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. तर तापसी पन्नूच्या 'आऊटसायडर्स फिल्म्स'ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची कथा पवन सोनी आणि अजय बहल यांनी लिहिली आहे. नुकताच तापसीने या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करून या चित्रपटावियाषयी माहिती दिली आहे. (Actress)

तापसी 'दोबारा' या चित्रपटामध्ये शेवटची दिसली होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नव्हती. या चित्रपटाला बॉयकॉटचा सुद्धा सामना करावा लागला होता. त्यानंतर 'दोबारा' ओटीटीवर प्रदर्शित झाला जिथे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. (OTT)

तापसी पन्नूच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचे अनेक चित्रपट प्रलंबित आहेत. शाहरुखसह ती 'डंकी' चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याशिवाय तापसी 'जण गण मन', 'एलियन' आणि 'वो लाडकी हैं कहां' चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Movie)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com