Happy Birthday Shraddha Kapoor: सौंदर्यवती श्रद्धा कपूरचा आज ३७ वा वाढदिवस, बर्थडे गर्लबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Shraddha Kapoor Birthday: सौंदर्य, अभिनय आणि क्यूट स्माईल अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे.
Shraddha Kapoor Birthday
Shraddha Kapoor BirthdayInstagram
Published On

Happy Birthday Shraddha Kapoor

सौंदर्य, अभिनय आणि क्यूट स्माईल अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस आहे. आज श्रद्धा कपूर आपला ३७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. श्रद्धा कपूर अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी आहे. आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर श्रद्धाने बॉलिवूडमध्ये टॉप अभिनेत्रींमध्ये स्थान मिळवलंय. श्रद्धाला 'आशिकी २' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये विशेष ओळखली. या पहिल्यावहिल्या चित्रपटाने तिला रातोरात स्टार बनवले. आज श्रद्धाच्या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया....

Shraddha Kapoor Birthday
Surbhi Chandna Wedding : 'इश्कबाज' फेम सुरभी चंदना अडकली लग्न बंधनात, विवाहसोहळ्याचा थाट पाहिलात का?

अभिनेत्री श्रद्धा कपूरचा जन्म ३ मार्च १९८७ रोजी झाला. तिचे वडील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूर आहेत, तर आई शिवांगी कोल्हापुरी आहे. श्रद्धा कपूर आज एक लोकप्रिय अभिनेत्री असली तरी तिला चित्रपटामध्ये काम करायचं नव्हतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या १६ व्या वर्षी श्रद्धाला सलमान खानच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती, पण तिने ती ऑफर नाकारली.. श्रद्धाने मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, सिनेसृष्टीमध्ये पाऊल ठेवण्यापूर्वी बोस्टनमध्ये कॉफी शॉपमध्ये काम करायची. तिने पॉकेटमनीसाठी कॉफी शॉपमध्ये जॉब सुरू केला होता.

२०१० मध्ये रिलीज झालेल्या 'तीन पत्ती' चित्रपटातून श्रद्धा कपूरने आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. यानंतर श्रद्धा 'लव्ह का द एंड' या चित्रपटातही दिसली होती. मात्र, त्या सुरुवातीच्या चित्रपटांमधून त्याला फारशी ओळख मिळाली नाही. यानंतर २०१३ मध्ये रिलीज झालेल्या महेश भट्ट यांच्या 'आशिकी २' चित्रपटात काम केल्यानंतर श्रद्धाला बॉलिवूडमध्ये विशेष ओळख मिळाली. या चित्रपटाने श्रद्धाला इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख दिली. या चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही.

Shraddha Kapoor Birthday
Anant-Radhika Pre-wedding : मुलाचं भावनिक भाषण ऐकून मुकेश अंबानींचे डोळे आले भरून; Watch Video

'आशिकी २' या म्युझिकल रोमँटिक चित्रपटातून श्रद्धा रातोरात स्टार झाली. या चित्रपटातील आरोहीच्या भूमिकेतून तिने सर्वांची मने जिंकली होती. या चित्रपटानंतर श्रद्धाने अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. 'आशिकी २' नंतर, श्रद्धा कपूरने 'एक व्हिलन', 'हैदर', 'हसीना पारकर', 'एबीसीडी २', 'बागी', ​​'स्त्री' आणि 'छिछोरे' यासह अनेक चित्रपटांमधील तिच्या अभिनयाचे चाहत्यांनी कौतुक केले. आज श्रद्धाला सिनेसृष्टीत येऊन १२ वर्षे झाली आहेत. तिने फार कमी दिवसांत आपले यश संपादन केले आहे.

Shraddha Kapoor Birthday
Maharashtrachi Hasya Jatra : महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तूला मिळालं म्हाडाचं घर, 'दत्तू चाळीविषयी काय म्हणाला दत्तू? जाणून घ्या

मीडिया रिपोर्टनुसार, श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती सुमारे ५७ कोटी रुपयांहून अधिक आहे. ती एका चित्रपटासाठी सहा कोटी रुपयांच्या आसपास मानधन घेते. याशिवाय जाहिराती आणि सोशल मीडियावर एक प्रमोशनल पोस्ट करण्यासाठी ती लाखो रुपयांचं मानधन घेते.

Shraddha Kapoor Birthday
Devoleena Bhattacharjee: देवोलिना भट्टाचार्जीच्या मित्राची अमेरिकेत गोळी मारून हत्या, PM मोदींकडे केलं मदतीचं आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com