Shilpa Shetty Dance : 'तुने दिल पे चलायी छुरीया' गाण्यावर शिल्पा शेट्टीचा जबरदस्त डान्स, पन्नाशीतही कमालीची एनर्जी; नेटकऱ्यांकडून कौतुक

शिल्पा तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच पोस्ट करते. नुकतंच शिल्पाने ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे. जो पाहून तुमचेही पाय थिरकतील.
ENTERTAINMENT NEWS
Shilpa Shetty DanceSaam Tv
Published On

नव्वदच्या दशकातील एव्हरग्रीन अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजही चाहत्यांची लाडकी आहे. अभिनयासह शिल्पा शेट्टीने तिच्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. सोशल मीडियावर शिल्पाचा चाहतावर्ग मोठा आहे. शिल्पा तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच पोस्ट करते. नुकतंच शिल्पाने ट्रेडिंग गाण्यावर डान्स केला आहे. जो पाहून तुमचेही पाय थिरकतील.

ENTERTAINMENT NEWS
Barber Viral Video: सलूनवाल्याचं किळसवाणं कृत्य; कापलेले केस भाजीमध्ये टाकून खाल्ले, Video व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एका हिंदी गाण्याचा ट्रेंड सुरू आहे. 'तुने दिल पे चलायी छुरीया' असं गाण्याचं नाव आहे. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या गाण्यावर डान्सचे रिल्स शेअर केले आहेत. आता अभिनेत्री शिल्पा शेट्टीला देखील 'दिल पे चलायी छुरीया' या गाण्याची भुरळ पडली आहे. शिल्पाने या गाण्यावर डान्स करत नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अभिनेत्री शिल्पा शेट्टीने निळ्या रंगाचा घरारा ड्रेस परिधान केला आहे. कानात झुमके आणि आकर्षक शिल्पाचा लूक आहे. यामध्ये शिल्पाने तिच्या हटके स्टाईलमध्ये 'तुने दिल पे चलायी छुरीया' या गाण्याच्या लिरिक्सवर डान्स केला आहे. शिल्पाचे एक्सप्रेशन आणि स्टेप्स पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत.

शिल्पाने शेअर केलेल्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, कमालच! या वयात देखील एवढी एनर्जी अशी कमेंट केली आहे. तर काहींनी हॉर्ट, फायर अश्या इमोजी दिल्या आहेत.

ENTERTAINMENT NEWS
Hindustani Bhau Viral Video: माधुरी हत्तीण वादात हिंदुस्थानी भाऊची उडी; कोल्हापुरातील आंदोलकांना केली शिवीगाळ, व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com