Jhalak Dikhhla Jaa 10: माधुरी दीक्षितने 'मॉम टू बी' आलियासाठी दिले खास गिफ्ट, नीतू झाली भावूक

बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीतू कपूर दिसणार 'झलक दिखला जा' प्रसिद्ध डान्स शोमध्ये.
Madhuri Dixit Alia Bhatt Neetu Kapoor
Madhuri Dixit Alia Bhatt Neetu KapoorSaam TV

मुंबई: डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा' नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. या कार्यक्रमात (Program) सादर होणारे डान्स प्रेक्षकांच्या मनावर छाप पडतात. तसेच या कार्यक्रमाचे परीक्षक प्रेक्षकांच्या मनात घर करतात. कार्यक्रमाला अजून मनोरंजक बनविण्यासाठी नवनवीन गोष्टी कार्यक्रमात केल्या जात असतात. नुकताच इंटरनॅशनल सेन्सेशन किली पॉल या कर्यक्रमात येऊन गेला. किली पॉलने त्याच्या डान्सने सगळ्यांचे मनोरंजन केले. येणार आठवडा हा 'कपूर स्पेशल' असणार आहे. ज्यामध्ये बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री नीतू कपूर परीक्षक म्हणून येणार आहे.

Madhuri Dixit Alia Bhatt Neetu Kapoor
Big Boss Marathi 4: बॉलिवूडमधील मराठमोळ्या 'इक्बाल'ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? पुष्पा स्टाईलमध्ये घरात प्रवेश

नीतू कपूरच्या एन्ट्रीने कार्यक्रमाला चार चाँद लागणार आहेत. कार्यक्रमाच्या अपकमिंग एपिसोडचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आला आहे. प्रोमोमध्ये कारण जोहर नीतू कपूरचे स्वागत करताना दिसत आहे. सर्व स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्समुळे एपिसोड धमाकेदार होत आहे. नीतू कपूर सुद्धा कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहे.

कार्यक्रमाचा हा भाग कपूर स्पेशल असल्याने कपूर कुटुंबाशी संबंधित डान्स या भागात करण्यात आले आहेत. या भागातील एका डान्सने नीतू कपूरचे मन भरून आले. नीती टेलर आणि तिच्या कोरिओग्राफरने आलिया आणि रणबीर यांच्या लग्नाचे सीन रेक्रिएट केले आहेत. नीती आणि तिच्या कोरिओग्राफरने आलिया आणि रणबीर यांचा लग्नातील लूक सुद्धा केला आहे. परफॉर्मन्सपाहून नीतू कपूर भावूक झालेली आपल्याला दिसत आहे. (Alia Ranbir)

त्यानंतर माधुरी दीक्षितने आलियासाठी एक खास गिफ्ट नीतू कपूरला दिले. गिफ्ट देताना माधुरी म्हणाली, "आलिया आणि रणबीर आई-बाबा होणार आहेत, मी त्यांच्यासाठी काहीतरी आणलं आहे." एक सुंदर बाळ कृष्णाची मूर्ती माधुरीने आलियाला गिफ्ट दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com