Big Boss Marathi 4: बॉलिवूडमधील मराठमोळ्या 'इक्बाल'ची बिग बॉसच्या घरात एन्ट्री? पुष्पा स्टाईलमध्ये घरात प्रवेश

'बिग बॉस मराठी ४'च्या घरात होत आहे नवीन एन्ट्री, हा स्पर्धक बदलणार का घराचा चेहरा.
Marathi Bigg Boss
Marathi Bigg BossSaam Tv
Published On

मुंबई: 'बिग बॉस मराठी ४' (Big Boss Marathi) हा शो सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. 'ऑल इज वेल' म्हणत सर्व स्पर्धकांनी घरामध्ये प्रवेश केला होता. पहिल्याच दिवसापासून 'बिग बॉस'च्या घरात वादाला सुरुवात झाली. टास्क आणि नॉमिनेशन यामुळे घरामध्ये गटबाजीला सुरूवात झाली आहे. त्यातच आता 'बिग बॉस'च्या घरामध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्याची (Actor) एन्ट्री झाली आहे.

यावर्षी बिग बॉसच्या घराला चाळीचे स्वरूप दिले आहे. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या १६ सदस्य आहेत. या सर्व सदस्यांमध्ये पहिल्या दिवसापासूनच वादाची ठिणगी पडली होती. वादांचे रूपांतर गटांमध्ये झाले आहे. त्यातच मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता या स्पर्धेत सहभागी झाला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील (Program) यशवर्धन चौधरी म्हणजेच श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आहे.

कलर्स मराठी वाहिनीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक नवीन एन्ट्री होताना दिसत आहे. यावेळी एन्ट्री करताना श्रेयस तळपदे म्हणत आहे की, “या घराने आतापर्यंत बऱ्याच एन्ट्री बघितल्या असतील, आता या घरात होतेय माझीही धमाकेदार एन्ट्री… बघत राहा बिग बॉस मराठी…! झुकेगा नही साला…!”

Marathi Bigg Boss
Actor Arun Bali Passes Away: ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एन्ट्री करताना श्रेयस तळपदेच्या गळ्यामध्ये इतर स्पर्धकांनाप्रमाणे माईक सुद्धा आहे. त्यामुळे श्रेयस खरंच या पर्वामध्ये आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक म्हणून पाहायला मिळणार, अशी चर्चा सर्वत्र होत आहे. प्रोमोपाहून बिग बॉसचे चाहते आणि श्रेयस तळपदेचे फॅन्स चकित झाले आहेत. श्रेयसच्या एन्ट्रीने घराचा चेहराच बदलून जाईल असे अनेकांचे म्हणणे आहे. तर काहीजण श्रेयस त्याच्या 'आपटी थापडी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला आहे असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com