सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक अदिती राव हैदरी आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अदितीने तीची छाप उमटवली आहे. आज अदिती आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने अभिनेत्रीच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफविषयी जाणून घेऊया.
अदितीचा जन्म २८ ऑक्टोबर १९८५ मध्ये हैदराबादमध्ये राजघराण्यात झाला. मा.पंतप्रधान अकबर हैदरी अदितीचे पणजोबा आहेत. तसेच माजी राज्यपाल मोहम्मद सालेह अकबर हैदरी यांची नात आहे. आदितीचे आई हिंदू आणि वडील मुस्लिम आहेत. अदिती तिच्या आडनावात आई आणि वडील दोघांची नाव घेते.
अदिती राव हैदरीने २००६मध्ये प्रजापती या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल टाकले. यानंतर नंतर तिने सलमान आणि काजल यांच्यासोबत सिनामिका चित्रपटात काम केले. पद्मावत, रॉकस्टार, वजीर चित्रपटांमध्ये काम केले आहेत.
वयाच्या २१ व्या वर्षी अदिती राव हैदरी सत्यदीप मिश्रा यांच्यासोबत लग्नबंधनात अडकली. मात्र या दोघांचे नाते जास्त काळ टिकले नाही. केवळ १७ वर्षाची असताना अदिती सत्यदीपच्या प्रेमात पडली होती. यानंतर या दोघांनी लग्न केले. मात्र काही वर्षातच हे वेगळे झाल्याने अदितीला मोठा धक्का बसला होता.
सत्यदीप आणि अदिती यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सत्यदीप आणि अदिती दोघे एकमेकांना १७ वर्षांपासून ओळखत होते. कालांतरीने त्यांच्या ओळखीचं मैत्रीत रुपांतर झालं. त्यानंतर मैत्रीचं प्रेमात… नातं अधिक घट्ट झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला होता.मात्र लग्नाच्या दोन वर्षांनंतर सत्यदीप आणि अदिती यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये सत्यदीप आणि अदिती यांचा घटस्फोट झाला.
यानंतर अदिती राव हैदरी अभिनेता सिद्धार्थशी लग्नबंधनात अडकली. या दोघांची पहिली भेट २०२१ मध्ये एका तेलुगू चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. महासमुद्रम नावाच्या या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान एकमेकांच्या नजरा जुळल्या. ते सुरुवातीला एकमेकांचे मित्र होते. त्यानंतर हळूहळू त्यांच्या मैत्रिचे प्रेमात रुपांतर झाले अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघे १६ सप्टेबंर २०२४ मध्ये लग्नबंधनात अडकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.