Salman Khan House Firing Shatrughan Sinha: "गोळीबाराची घटना कळाल्यानंतर..."; सलमान खानच्या सुरक्षेविषयी शत्रुघ्न सिन्हांनी व्यक्त केली चिंता

Salman Khan House Firing News: सलमान खान गोळीबार प्रकरणावर बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
Shatrughan Sinha On Salman Khan House Firing
Shatrughan Sinha On Salman Khan House FiringSaam Tv

Shatrughan Sinha On Salman Khan House Firing

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Bollywood Actor Salman Khan) वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट (Bandra Galaxy Apartment) बाहेर दोन व्यक्तींकडून १४ एप्रिलला सकाळी हवेत गोळीबार करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणावर बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. (Bollywood)

Shatrughan Sinha On Salman Khan House Firing
Salman Khans House Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, दोन्ही आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी

यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेत्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. टाईम्स नाऊसोबत संवाद साधताना शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सलमान त्याचे कुटुंबीय आणि त्याचे वडील लेखक सलीम साब हे लोकं माझे जीवाभावाचे माणसं आहेत. रविवारी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना घडल्यानंतर मला अभिनेत्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या सुरक्षेची काळजी वाटली.” (Bollywood Actor)

अभिनेते शत्रुघ्न सिन्हा मुलाखतीत पुढे म्हणाले की, “सलीम साब आणि सलमान खान हे दोघेही फिल्म इंडस्ट्रीची शान आहे. एक कुटुंब म्हणून आपण भयंकर आणि भ्याड हल्ल्याचा पुढे येऊन निषेध करायला हवा. राज्य सरकारने सेलिब्रिटी मंडळींच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यायला हवं. अशा प्रकारे, उघडपणे दहशत पसरवणे खूप वाईट आहे. सलमान खानच्या चाहत्यांचे आशिर्वाद आणि प्रार्थना त्याला नेहमीच सुरक्षित ठेवतील, याचा मला विश्वास आहे..” (Bollywood Film)

Shatrughan Sinha On Salman Khan House Firing
Milind Gawali Post: मिलिंद गवळीने ‘लगान’मधील अभिनेत्रीसोबत केलंय काम; पण चित्रपटच प्रदर्शित झाला नाही...

सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. या आरोपींना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज येथून अटक केली. त्यानंतर आरोपींना मुंबईत आणण्यात आले. आरोपींना मंगळवारी (१६ एप्रिल) कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कोर्टाकडे आरोपींना १४ दिवसांची पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. पण कोर्टाने निकाल राखून ठेवत नंतर आरोपींची रवानगी १० दिवसांच्या पोलिस कोठडीत केली. मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक केल्यानंतर आज किल्ला कोर्टामध्ये हजर करण्यात आले. (Entertainment News)

Shatrughan Sinha On Salman Khan House Firing
Salman Khans House Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण, दोन्ही आरोपींना १० दिवसांची पोलिस कोठडी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com