Shahnawaz Pradhan : मिर्झापूर फेम 'गुड्डू भैय्या'च्या सासऱ्यांचे निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

टेलिव्हिजनवरील अनेक भूमिका गाजवणारे अभिनेते शाहनवाज प्रधान यांचे निधन झाले आहे.
Mirzapur Fame Shahnawaz Pradhan
Mirzapur Fame Shahnawaz Pradhan Saam Tv

Mirzapur Fame Shahnawaz Pradhan: टेलिव्हिजनवरील अनेक भूमिका गाजवणारे अभिनेते शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Mirzapur Fame Shahnawaz Pradhan
Tappu Is Back In TMKOC: 'तारक मेहता का उलटा चश्मा'मध्ये टपूची ग्रँड एन्ट्री; 'हा' अभिनेता साकारतोय महत्त्वाची भुमिका

मिर्झापूर या प्रसिद्ध वेब सीरिजमध्ये 'गुड्डू भैय्या' म्हणजेच अली फजलच्या सासऱ्याची भूमिका अभिनेता शाहनवाज प्रधान यांनी साकारली होती. सहकलाकार राजेश तैलंगने सोशल मीडियावर या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यासोबतच प्रतिमा काझमीसारख्या अनेक कलाकारांनीही सोशल मीडियावर शाहनवाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Mirzapur Fame Shahnawaz Pradhan
Aroh Welankar: “बाळासाहेबही आज खूश असतील.. ” शिंदे गटाचं अभिनंदन करताना मराठी अभिनेत्याचं ट्वीट चर्चेत

शाहनवाज यांनी गुड्डू भैय्याच्या सासऱ्याची भूमिका साकारल्यानंतर बरीच चर्चा होत होती. शाहनवाज प्रधान यांचा जन्म 6 डिसेंबर 1963 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शाळेत असतानाच शाहनवाज यांना अभिनयात रस होता. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना त्यांनी एक थिएटर ग्रुप देखील जॉईंट केला होता. शाहनवाज यांनी 1991 साली सिनेसृष्टीत करियर घडवायचं म्हणून मुंबई गाठली. जेव्हा आपल्या करियरची सुरुवात केली तेव्हा त्यांनी दुरदर्शनवरील शो श्री कृष्ण या मालिकेत नंदची भूमिका साकारली होती.

Mirzapur Fame Shahnawaz Pradhan
Shiv Thakare: शिवला चाहत्याने पाठवली चिठ्ठी ‘आई शप्पथ. तुम्हाला खूप...’ म्हणत केलं प्रेम व्यक्त

त्यानंतर अलिफ लैला या मालिकेत देखील मुख्य भूमिका साकराली होती. आपल्या सिने कारकिर्दित शाहनवाज यांनी अनेक मालिकेत आणि अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकरल्या आहेत. ओटीटीवर सर्वाधिक चालणाऱ्या 'मिर्झापूर १ आणि २' या वेबसीरिजमध्येही त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती.सोबतच रईस, खुदा हाफिज , द फॅमिली मॅन या कलाकृतीत ही त्यांनी काम केले आहे. सोबतच लवकरच 'मिर्झापूर ३' मध्ये ही शाहनवाज दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com