बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांना ओळखले जाते. हे जोडपे कायमच चर्चेत असते. सध्या त्यांच्या मुलीचा म्हणजे राहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहा (Raha Kapoor) आई आलिया सोबत मजा मस्त करताना पाहायला मिळत आहे. तर बाबा रणबीर कपूरच्या टीमला चीअर करण्यासाठी राहा फुटबॉल स्टेडियमवर आली आहे.
रणबीर, आलिया आणि त्यांची लेक राहा अनेक वेळा एकत्र स्पॉट होतात. राहाचे क्यूट फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक राहाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, राहा रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत फुटबॉलच्या स्टेडियमवर फिरताना पाहायला मिळत आहे.
रणबीरची टीम 'मुंबई सिटी एफसी' आणि हैदराबाद एफसी यांच्यात शनिवारी (30 नोव्हेंबर)सामना रंगला. हा सामना पाहण्यासाठी आलियासोबत राहा देखील आली होती. सुरुवातीला व्हिडीओमध्ये राहा आलियासोबत खेळताना पाहायला मिळत आहे. तर नंतर आलिया, रणबीर आणि राहा एकत्र स्टेडियमवर फिरताना पाहायला मिळत आहेत. व्हिडीओमध्ये रणबीरने राहाला उचलून स्टेडियमवर फेरफटका मारताना दिसत आहे.
रणबीरच्या लेकीने त्याला मॅचिंग अशी निळ्या रंगाची जर्सी परिधान केली आहे. तर आलियाने ब्लॅक जॅकेट आणि पांढरा टँक टॉप परिधान केला आहे. राहाला पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना खूप आनंद झाला.
रणबीर आणि आलियाच्या आयुष्यात 2022 मध्ये राहा आली. आता लवकरच आलिया भट्ट आणि रणबीर कपूर 'लव्ह अँड वॉर' या त्यांच्या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.