बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार ॲक्शनमुळे ओळखला जाणारा सनी देओलचा (Sunny Deol) आज (19 ऑक्टोबर)वाढदिवस आहे. त्याच्या 'ढाई किलोचा हात' या डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सनी देओलचे खरे नाव अजय सिंग देओल असे आहे. त्याचा जन्म पंजाबच्या लुधियाणामध्ये झाला. सनी देओल हा 90 च्या दशकातला सुपरस्टार आहे. त्याने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये त्याची ॲक्शन हिरो अशी ओळख निमार्ण झाली आहे.
सनी देओल आपल्या करिअरमध्ये नेहमी प्रगती करताना पाहायला मिळाला आहे. त्याने ॲक्शनसोबत रोमँटिक आणि इमोशनल सीन्सही केले आहेत. त्यांने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
'डर' या चित्रपटात सनी देओल आणि शाहरुख खानने एकत्र काम केलं आहे. 'डर' हा चित्रपट 1993 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सनी देओलने या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली होती तर शाहरुख खान (Shah Rukh Khan) खलनायकाच्या भूमिकेत होता. मात्र या चित्रपटात हिरोपेक्षा खलनायकालाच जास्त प्रेम मिळाले. सनी देओल 67 वर्षाचा झाला आहे.
'डर' या चित्रपटामुळे शाहरुख खान जास्त लोकप्रिय झाला. यामुळे सनी देओल खूप संतापला होता. यामुळेच त्यांनी शाहरुख खानसोबत जोरदार भांडण केलं आणि त्यांनी यश चोप्रासोबत काम करणार नाही असं ही सांगितले. यामुळे सनी देओल आणि शाहरुख खान तब्बल 16 वर्षांपासून एकमेकांशी बोलत नव्हते. गदर 2 च्या सक्सेस पार्टीमध्ये शाहरुख खानने हजेरी लावून सनी देओलला मिठी मारली आणि त्यांच्यातला 16 वर्षांचा अबोला मिनिटांत दूर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.