KRK Arrest: अभिनेता के.आर.के.ला मुंबईतून अटक; ट्वीट करत केला बॉलिवूडच्या भाईजानवर गंभीर आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण

KRK Arrest: अभिनेता आणि समीक्षक कमाल राशिद खान उर्फ केआरकेला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे.
KRK Arrest In Mumbai
KRK Arrest In Mumbaisaam tv
Published On

KRK Arrest In Mumbai

अभिनेता आणि समीक्षक कमाल राशिद खान उर्फ केआरकेला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. के.आर.के. अनेकदा बॉलिवूड चित्रपटांची विडंबनात्मक समीक्षा करत असतो. नुकताच त्याला विमानतळावर अटक केल्यानंतर त्याने सलमान खानवर गंभीर आरोप केले आहेत. चला तर जाणून घेऊया, नेमकं त्याने का भाईजानवर आरोप केले. (Bollywood Actor)

KRK Arrest In Mumbai
Raha Kapoor First Look: निळे डोळे अन् क्युट स्माइल, आलिया-रणबीरने पहिल्यांदाच दाखवला मुलगी राहाचा चेहरा

अभिनेता आणि समीक्षक के.आर.के.ला २०१६च्या एका प्रकरणामध्ये मुंबईत अटक करण्यात आली आहे. त्याने नुकतंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्वीटर)वर ही बातमी शेअर केली. तो आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो, “मी गेल्या वर्षभरापासून मुंबईत आहे. मी माझ्या सर्व न्यायालयीन तारखांना नेहमीच उपस्थित असतो. आज मी न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी दुबईला जाणार होतो. पण मुंबई पोलिसांनी मला विमानतळावर अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मी २०१६च्या एका प्रकरणात वॉन्टेड आहे.”

के.आर.के.ने त्याच्या ट्वीटमध्ये पुढे म्हटलाय, “सलमान खान म्हणतोय की, त्याचा 'टायगर ३' हा चित्रपट माझ्यामुळे फ्लॉप झाला आहे. पोलिस ठाण्यामध्ये किंवा तुरुंगामध्ये जर माझा मृत्यू झाला तर तुम्हा सर्वांना कळायला हवं की तो खून आहे. आणि तुम्हाला त्याचा मास्टरमाईंड कोण आहे, हे माहित हवं.” असं तो आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला आहे.

के.आर.के. अनेकदा सेलिब्रिटींबद्दल वादग्रस्त ट्विट करत असतो. कमलवर विनाकारण सेलिब्रिटींची बदनामी करणारे ट्विट केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी तो अनेकदा तुरुंगात गेला आहे. कमलला २०२२ मध्येही दोनदा अटक करण्यात आली होती. सर्वप्रथम, इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याच्या आरोपाखाली के.आर.के.ला अटक करण्यात आली आहे. २०१६ मध्ये विक्रम भट्ट यांनीही कमलविरोधात गुन्हा दाखल केला होता. (Entertainment News)

KRK Arrest In Mumbai
Mukta And Sagar Wedding Look: 'प्रेमाची गोष्ट'मध्ये रंगणार लग्नविशेष सोहळा, सागर- मुक्ताच्या पारंपारिक लूकने वेधले लक्ष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com