Bipasha Basu-Karan Grover: बिपाशा-करणला कन्यारत्न; काही तासात मुलीचं नावही जाहीर केलं

बिपाशाने शनिवारी एका मुलीला जन्म दिला. या जोडप्याने त्यांच्या नवजात बाळाचे नाव शेअर केले आहे.
Bipasha Basu and Karan Grover Bless With Baby Girl
Bipasha Basu and Karan Grover Bless With Baby GirlSaam Tv
Published On: 

Bipasha-Karan Welcomes Baby Girl: बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि तिचा अभिनेता-पती करण सिंग ग्रोव्हर यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. बिपाशाने शनिवारी एका मुलीला जन्म दिला. या जोडप्याने सोशल मीडियावर त्यांच्या नवजात बाळाचे नाव शेअर केले आहे. इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत बिपाशाने त्यांच्या मुलीचे नाव सांगितले आहे, “देवी बासू सिंग ग्रोव्हर. आपल्या प्रेमाचे आणि देवीच्या आशीर्वादाचे भौतिक प्रकटीकरण आता झाले आहे आणि ती देवी आहे”, असे बिपाशाने स्टोरीमध्ये लिहिले आहे.

Bipasha Basu and Karan Grover Bless With Baby Girl
Bigg Boss 16: सलमान खानने केले प्रियंकाला घराबाहेर, म्हणाला 'तुम्ही ओझे झाला आहात'

बिपाशा आणि करणने सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताच त्यांचे मित्र आणि चित्रपट क्षेत्रातील सहकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सोफी चौधरी यांनी कमेंट केली आहे की, “बेस्ट बेस्ट बेस्ट न्यूज!! तुमच्यासाठी खूप आनंद झाला आहे!!!!! देव तुमच्या छोट्या परीला आशीर्वाद देवो.”

इंस्टाग्रामवर पोस्ट करत बिपाशाने ती गरोदर असल्याचे सांगितले होते. ऑगस्टमध्ये केलेल्या या पोस्टमध्ये बिपाशाने लिहिले होते की, “एक नवीन वेळ, एक नवीन टप्पा, एक नवीन प्रकाश आमच्या जीवनाच्या प्रिझममध्ये आणखी एक अनोखी छटा आणणार आहे. आम्हाला पूर्वीपेक्षा थोडे अधिक पूर्ण बनवत आहे. आम्ही या आयुष्याची सुरुवात वैयक्तिकरित्या केली. आम्ही एकमेकांना भेटलो आणि तेव्हापासून आम्ही दोघे होतो. फक्त दोघांवर खूप प्रेम करणे आम्हाला थोडेसे अन्यायकारक वाटले… इतक्या लवकर, आपण जे पूर्वी दोन होतो ते आता तीन होऊ.”

Bipasha Basu And Karan Grover Blessed with Baby Girl
Bipasha Basu And Karan Grover Blessed with Baby GirlSaam Tv

बिपाशा आणि करणने बिपाशाच्या आरोग्याविषयी अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर केल्या होत्या. तेव्हा बिपाशाने सांगितले होते की तिची दिनचर्या पूर्णपणे बदलली आहे. “करण हा एक चांगला नवरा आहे. तो मला काहीही करू देत नाही, कारण मी सुरुवातीला खूप आजारी होतो. या टप्प्यात तो खूप साथ दिली आहे. कारण त्याने मला इतके आजारी कधी पाहिले नव्हते.” असे बिपाशाने माध्यमांशी बोलताना सांगितले.

करणने बिपाशासाठी फक्त त्यांच्या जवळच्या मित्रांसह एका इंटिमेट बेबी शॉवरचे आयोजन केले होते. पण त्याआधी बिपाशाने पारंपारिक बेबी शॉवर केला होता. ज्यामध्ये ती साडी नेसली होती. या समारंभात तिच्या कुटुंबीयांनी तिला पारंपारिक बंगाली जेवण दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com