Surya Kiran Death: प्रसिद्ध दिग्दर्शकाचं काविळीमुळे निधन; अवघ्या 48 व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप

Surya Kiran Passed Away: टॉलिवूड अभिनेते सुर्य किरण यांचे ११ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झालेले आहे.
Surya Kiran Death
Surya Kiran DeathTwitter
Published On

Surya Kiran Dies Age 48

तेलुगू सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येतेय. टॉलिवूड अभिनेते सुर्य किरण यांचे काल (११ मार्च) अल्पशा आजाराने निधन झालेले आहे. सुर्यकिरण यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन झाले असून त्यांनी चेन्नईतल्या त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून सुर्यकिरण कावीळमुळे त्रस्त होते. अभिनेत्याच्या अचानक एक्झिटने चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (Tollywood)

Surya Kiran Death
Bastar : अंगावर शहारं आणणारं 'Bastar'मधील नवं गाणं रिलीज; ऐकल्यानंतर तुम्हीही ठोकाल सॅल्यूट

सुर्य किरण यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांच्या प्रवक्त्याने ट्विट करत दुजोरा दिला आहे. पीआरओ सुरेश यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुर्य किरण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “दिग्दर्शक सुर्य किरण यांचे काविळमुळे निधन झाले आहे.” अशी त्यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सुर्य किरण यांनी आपल्या सिनेकारकिर्दित जवळपास २०० हून अधिक तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले होते. सुर्य किरण यांनी 'ओरू पेन्नू', 'स्नेहिकन', 'कदल मींगल' यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांतून काम केले. (Actor)

सुर्यकिरण यांनी आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून २०२० वर्षी आलेल्या ‘बिग बॉस तेलगू’ मध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. या दिग्दर्शकाच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. सुर्यकिरण एक प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक होते. बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत डेब्यू केलेल्या सुर्य किरणने २००३ मध्ये ‘सत्यम’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. सूर्य किरण यांचा हा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. (Entertainment News)

Surya Kiran Death
Zee Cine Awards Winners शाहरुख खानच्या 'जवान' आणि 'पठान'चा दबदबा, पाहा विनर्सची संपूर्ण लिस्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com