Bollywood Celebrity Support Elvish Yadav: ‘ट्रॉफी तुझीच आहे भावा...’ Bigg Boss OTT 2 च्या फिनालेसाठी एल्विशला शिव ठाकरेसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा सपोर्ट

Bigg Boss OTT2 Finale News: सध्या सोशल मीडियावर एल्विश यादवची बरीच चर्चा होत असून अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी एल्विशला सपोर्ट केला आहे.
Bollywood Celebrity Support Elvish Yadav
Bollywood Celebrity Support Elvish Yadav Saam Tv

Shiv Thakare Support Elvish Yadav For Bigg Boss OTT2 Finale:

टेलिव्हिजनप्रमाणे आता ओटीटीवर देखील वादच्या सापडणाऱ्या ‘बिग बॉस ओटीटी २’ची बरीच चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या ‘बिग बॉस ओटीटी २’चा आज ग्रँड फिनाले सोहळा आहे. हा सोहळा आज संध्याकाळी अगदी भव्य दिव्य पद्धतीने ग्रँडफिनालेचा सोहळा रंगणार आहे.

अभिषेक मल्हान, एल्विश यादव, पूजा भट, मनीषा राणी, बेबिका धुर्वे हे ५ स्पर्धक ‘बिग बॉस ओटीटी २’ चे टॉप ५ मधील स्पर्धक आहेत. सध्या सोशल मीडियावर एल्विश यादवची बरीच चर्चा होते. ‘बिग बॉस १६ चा उपविजेता आणि ‘बिग बॉस मराठी २’चा विजेता शिव ठाकरेने ‘बिग बॉस ओटीटी २’ च्या फिनालेसाठी एल्विश यादवला सपोर्ट केलाय.

Bollywood Celebrity Support Elvish Yadav
Bigg Boss OTT 2 Finale: अभिषेक मल्हानची प्रकृती बिघडली; फुकरा इंसान रुग्णालयात दाखल

शिव ठाकरे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याने ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन सुरू झाल्यापासून त्या शोला फॉलो करत आला आहे. त्याने अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा स्टोरीच्या माध्यमातून त्याने अनेकदा शोवर भाष्य ही केले आहे.

नुकतेच शिवने एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्या शेअर केलेल्या व्हिडीओत एल्विश यादवने माझ्यानंतर (शिव ठाकरे) एल्विश यादवला ट्रॉफी मिळलीय. असं वक्तव्य केलंय. पुढे कॅप्शनमध्ये अभिनेता म्हणतो, “म्हणुन मला एल्विश यादव हा माणूस आवडतो. दिल का बंदा. गणपती बाप्पा मोरया. ट्रॉफी तुझीच आहे भावा...” असं म्हणत त्याने एल्विशला सोशल मीडियाच्या माध्यमातून सपोर्ट केला आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’च्या पहिल्या दिवसापासून शोप्रमाणेच शोमधील स्पर्धक देखील बरेच चर्चेत राहिले आहेत. अनेक स्पर्धक आपल्या उत्तम खेळाने तर काही स्पर्धक आपल्या दमदार निर्णयामुळे कायमच चर्चेत राहिले आहे.

सध्या बिग बॉसच्या घरात विजेते पदासाठी दोन मजबूत स्पर्धक आहेत. त्यातील पहिला एल्विश यादव तर दुसरा अभिषेक मल्हान. दोघेही स्वत:ला ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता मानत आहेत. दरम्यान, दोन्हीही स्पर्धकांबद्दल बोलायचे तर, बिग बॉस ओटीटीच्या या सीझनमध्ये एल्विश वाइल्ड कार्ड म्हणून सहभागी झाला असला तरी देखील, तो हा शो जिंकेल असा सध्या सर्वत्र विश्वास आहे. तर ‘बिग बॉस ओटीटी २’चा पहिला फायनलिस्ट ठरलेला अभिषेक मल्हान स्वत:ला बिग बॉसचा विनर म्हणून समजत आहे.

Bollywood Celebrity Support Elvish Yadav
Amit Bhadana Received Threats: प्रसिद्ध युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी, FIR दाखल

‘बिग बॉस ओटीटी २’मधले बाकीचे टॉप ५ मधील तीन स्पर्धकांचीही सोशल मीडियावर बरीच क्रेझ दिसते. त्यातील पूजा भट्ट, मनीषा राणी आणि बेबिका ध्रुवे देखील कायमच चर्चेत राहतात. सोशल मीडियावर चाहत्यांना पूजा भट्ट ही तिच्या युनिक इमेजसाठी ओळखली जाते. तर मनीषा राणीचा मजेदार स्वभाव तर बेबिका ध्रुवेचा लूक देखील प्रेक्षकांना फारच आवडतो. मुख्यबाब म्हणजे, बिहार सरकारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेजप्रताप यादव यांनी एल्विश यादवला सपोर्ट करण्याचे आवाहन केले आहे.

Bollywood Celebrity Support Elvish Yadav
South Actor In Trouble : साऊथ अभिनेत्याला फेसबूक लाईव्ह महागात पडलं: पोलिसात गुन्हा दाखल

सोबतच एल्विश यादवला माहिरा शर्मा, करण कुंद्रा, अर्चना गौतम, शालीन भानोट, दिव्यांका त्रिपाठी आणि सोबतच आलिया भट्टने देखील सपोर्ट केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com