Bigg Boss Marathi: 'वेड' फेम अभिनेता करणार 'बिग बॉस मराठी 5'च्या घरात एन्ट्री, सोशल मीडियावर होतेय चर्चा

Bigg Boss Marathi Contestant: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस मराठीची चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये कोणते कलाकार दिसणार याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे. या कार्यक्रमात आता वेड चित्रपटातील अभिनेता दिसणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
Bigg Boss Marathi
Bigg Boss MarathiSaam Tv
Published On

सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस' मराठीची प्रचंड चर्चा आहे. 'बिग बॉस मराठी ५' सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये सूत्रसंचालनाची भूमिका रितेश देशमुख सांभाळणार आहे. रितेश देशमुखच्या होस्टिंगसाठी चाहते खूप उत्सुक आहे. या सीझनमध्ये कोणते कलाकार दिसणार आहे यासाठी चाहते उत्सुक आहेत. कलर्स मराठीच्या सोशल मीडियावरुन कलाकारांच्या नावाची हिंट देणारे पोस्टर शेअर केले जात आहे. नुकताच एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. त्यावरुन आणखी एका कलाकाराच्या नावाची चर्चा सुरु आहे.

Bigg Boss Marathi
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal: सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाला एक महिना पूर्ण, फिलिपिन्समध्ये सेलिब्रेशन; फोटो पोस्ट करत म्हणाली...

कलर्स मराठीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये वेड लावणारं प्रेम तर त्याच्याकडून शिकावं, पण हा आहे तरी कोण? असा व्हिडिओ शेअर केला आहे.या व्हिडिओवरुन दोन-तीन कलाकारांच्या नावाची चर्चा सध्या सुरु झाली आहे. आकाश ठोसर, प्रथमेश परब आणि शुंभकर तावडे या कलाकारांच्या नावाची चर्चा होत आहे. त्यापैकी शुभंकर तावडेचं नाव जास्त प्रमाणात घेतलं जात आहे. शुभंकर तावडेने रितेश देशमुखसोबत 'वेड' या चित्रपटात काम केले आहे.

Bigg Boss Marathi
Suniel Shetty: मोठ्या मनाचा सुनिल शेट्टी, कास्टिंग डायरेक्टरला गिफ्ट केला बंगला, नेमकं कारण काय?

यापूर्वी सोशल मीडियावर अजून काही कलाकारांच्या नावाची चर्चा सुरु होती. यात वर्षा उसगावकर, हार्दिक जोशी, प्रणव रावराणे बिग बॉस मराठीमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा होत होत्या. तर बिग बॉस मराठीच्या कलाकारांची नावे २८ जुलैला समोर येणार आहेत. यावेळी 'बिग बॉस मराठी'चं सूत्रसंचालन रितेश देशमुख करणार असल्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

Bigg Boss Marathi
Kiran Rao And Aamir Khan : "घटस्फोटानंतर मी खूप खूश आहे कारण..." विभक्त झाल्यानंतर ३ वर्षांनी असं का म्हणाली आमिर खानची दुसरी पत्नी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com