Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi Saam Tv

Bigg Boss Marathi : रितेश देशमुखवर चाहते भडकले; म्हणाले कुठे फिरतोय? आम्ही भाऊच्या धक्क्यावर वाट पाहतोय

Bigg Boss Marathi :बिग बॉसच्या घरात रितेश देशमुखचा भाऊचा धक्का कार्यक्रम होत नसल्याने बिग बॉस प्रेमी नाराज असल्याचे दिसले.
Published on

बिग बॉस मराठी सीझन 5 सध्या कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात रोज मजेदार खेळी पाहायला मिळाली. दर आठवड्याच्या शनिवारी- रविवारी भाऊचा धक्का हा कार्यक्रम रंगतो अशातच गेले दोन आठवडे भाऊचा धक्का हा कार्यक्रम झाला नाही. यामुळे बिग बॉस प्रेमीमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला. अशातच बिग बॉसच्या घरात शेवटचा आठवडा कसा असणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Bigg Boss Marathi
Khushboo Tawde- Sangram Salvi Baby: खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई -बाबा, गोंडस मुलीला दिला जन्म

बिग बॉस मराठीच्या घरात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतात. मागील आठवड्यात भाऊचा धक्क्याऐवजी महाराष्ट्राचा धक्का हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महाराष्ट्राची हास्यजत्राचे डॉ. निलेश साबळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. यानंतरच्या आठवड्यात देखील भाऊचा धक्का हा कार्यक्रम झाला नाही तर, बिग बॉसच्या घरात राखी सावंत, अनिल थत्ते, शरद उपाध्ये आणि अभिजीत बिचुकले यांनी एन्ट्री घेतली होती.

बिग बॉसच्या घरात रितेश देशमुखचा भाऊचा धक्का कार्यक्रम होत नसल्याने बिग बॉस प्रेमी नाराज असल्याचे दिसले. दरम्यान अनेकांनी रितेश देशमुखने बिग बॉस शो सोडला असल्याच्या अटकळ्या लावल्या. यानंतर रितेश देशमुख कामासाठी परदेशात असल्याच सांगितलं. अशातच सोशल मीडियावर रितेश देशमुखचे परिवारासोबतचे फोटो समोर आले आहेत ज्यावर बिग बॉस प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर जेनेलियाने काही कौटुंबिक फोटो पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये रितेश देशमुख दिसत आहे. रितेशने कुटुंबीयांसह एकत्र लाइव्ह मॅच पाहण्याचा आनंद लुटला आहे. सध्या मागील काही दिवसांपासून शूटिंगनिमित्त परदेशात आहे. जेनेलियाने केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने, “बिग बॉस सोडून कुठे फिरताय?”, असं म्हटलं तर आणखी एकाने, “तुम्ही फिरत आहात आणि आम्ही भाऊच्या धक्क्यावर तुमची वाट बघतो” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi : बिग बॉसमधून रितेश देशमुखची एक्झिट? ग्रँड फिनाले कोण करणार होस्ट? चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com