Ilu Ilu : बिग बॉस मराठी फेम मीराचा ‘इलू इलू’ चित्रपटात दिसणार हटके अंदाज ; म्हणाली, 'मला वेगळी भूमिका साकारताना...'

Ilu Ilu Movie : बिग बॉस मराठी फेम मीरा जगन्नाथ ही ‘इलू इलू’ चित्रपटात वेगळ्या भूमिकेत दिसणार असून तिचा या चित्रपटातील लूक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
meera jagannathan
meera jagannathanSaam Tv
Published On

Ilu Ilu Movie : आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने कायम चर्चेत राहणारी ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री मीरा जगन्नाथ आता हेमा बनून प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवायला सज्ज झाली आहे. हेमाचा बोल्ड अँड ब्युटीफुल अंदाज आपल्याला आगामी ‘इलू इलू’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. मीराचं दिलखेचक पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना मीरा म्हणाली, आजवरच्या माझ्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला ‘इलू इलू’च्या निमित्ताने करायला मिळाली याचा आनंद मला आहे. हेमा देसाई ही व्यक्तिरेखा मी स्वतः खूप एन्जॉय केली. पूर्णपणे नवं असं काहीतरी करून दाखवण्याचा माझा प्रयत्न होता. हेमा देसाई या भूमिकेच्या निमित्ताने मला वेगळ काही तरी करण्याची संधी मिळाली आहे.

meera jagannathan
Hania Aamir : चिकनी चमेलीवर पाकिस्तानी अभिनेत्रीचा भन्नाट डान्स, व्हिडीओ Viral

‘इलू इलू’ चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत. निर्माते बाळासाहेब फाळके आणि हिंदवी फाळके तर सहनिर्माते यश मनोहर सणस आहेत. छायांकन योगेश कोळी तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.

meera jagannathan
Janhvi Kapoor : 'आई आवडते, मुलगी नाही'; जान्हवी श्रीदेवींच्या तुलनेवर राम गोपाल वर्मांचे मोठे वक्तव्य

वैभव जोशी, वैभव देशमुख, प्रशांत मडपुवार यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, ऋषिकेश रानडे, आर्या आंबेकर, रोहित राऊत, जनार्दन खंडाळकर यांचा स्वरसाज लाभला आहे. संगीत रोहित नागभिडे, विजय गवंडे यांचे आहे. कलादिग्दर्शक योगेश इंगळे आहेत. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित ‘इलू इलू’ ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com