Bigg Boss 19: एका प्रकरणातून मारहाण, अनेक टीका, आता हा मराठी स्टँड-अप कॉमेडियन 'बिग बॉस'मध्ये दिसणार ?

Bigg Boss 19: सलमान खानचा लोकप्रिय शो 'बिग बॉस १९' आजपासून सुरू होत आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही या रिअॅलिटी शोमध्ये अनेक सेलिब्रिटी विजेतेपदासाठी लढताना दिसतील.
Bigg Boss 19
Bigg Boss 19Saam Tv
Published On

Bigg Boss 19: बिग बॉसच्या चाहत्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे. सलमान खानचा शोचा १९ वा सीझन सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही प्रेक्षकांना या शोमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये विनोदासाठी प्रसिद्ध असलेला प्रणित मोरे देखील सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया प्रणित मोरे कोण आहे?

बिग बॉसचे आतापर्यंत १८ सीझन झाले आहेत. आता १९ वा सीझन सुरू होणार आहे. टीव्हीसोबतच चाहते ते ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा शो पाहू शकतात. चाहते यासाठी खूप उत्सुक आहेत. यामध्ये अनेक टीव्ही कलाकार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असतील. त्याचबरोबर बिग बॉस १९ साठी स्टँड-अप कॉमेडियन प्रणितचं नावही समोर येत आहे.

Bigg Boss 19
'मला वाईटरित्या स्पर्श केला अन्...; शूटींग दरम्यान सलमान खानच्या अभिनेत्रीची काढली छेड

सोशल मीडियावर खूप लोकप्रिय

प्रणित सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. त्याचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. युट्यूबवरही त्याचे सबस्क्राइबर्सची संख्या मोठी आहे. इंस्टाग्रामवर २ हजारांहून अधिक पोस्ट करणाऱ्या प्रणितला इंस्टाग्रामवर ४ लाख ३१ हजार नेटकरी फॉलो करतात. त्याचे इंस्टाग्राम अकाउंट त्याच्या कॉमेडी व्हिडिओंनी भरलेले आहे. तर युट्यूबवर त्याचे १० लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

Bigg Boss 19
Arjun Bijlani: लग्नाच्या १२ वर्षांनंतर प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला घटस्फोट? स्वतः व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

या प्रकरणात प्रणितला मारहाण झाली होती

प्रणित मोरेने आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींवर विनोद केले आहेत. पण, अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' (२०२५) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या वीर पहाडियाची खिल्ली उडवणे प्रणितला चांगलेच महागात पडले. त्याच्या एका शो दरम्यान त्याने वीरवर काही विनोद केले. शो संपल्यानंतर, १०-१२ लोकांच्या एका गटाने वीरची खिल्ली उडवल्याबद्दल प्रणितला मारहाण केली. या प्रकरणात वीरने सांगितले की त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही. अभिनेत्याने प्रणितची माफी देखील मागितली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com