
भोजपुरी अभिनेता पवन सिंहवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप .
पत्नी ज्योती सिंहने सोशल मीडियावर रडत रडत सांगितली कहाणी
ज्योतीने सांगितले की, पवन दुसऱ्या तरुणीसोबत हॉटेलमध्ये जातो.
ज्योतीचा आरोप सोशल मीडियावर व्हायरल
Pawan Singh Wife Jyoti Singh Allegations : भोजपुरी सिनेसृष्टीतील अभिनेता पवन सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पवन सिंह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय . पवन सिंहच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. आता दुसऱ्या पत्नीसोबतचं नात्यात दुरावा आल्याचं चित्र आहे. पत्नी ज्योती सिंह हिने सोशल मीडियावर लाईव्ह येत पवन सिंहवर गंभीर आरोप केले आहेत. ज्योती सिंहच्या आरोपाने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
ज्योती सिंह हिने सोशल मीडियावर रडत रडत आपबीती व्यक्त केली. ज्योतीने संगितलं की, 'पवन सिंह हा स्वत:च्या बायकोला पकडण्यासाठी पोलिसांना धाडतोय. निवडणुकीसाठी बायकोचा वापर केला. आता दुसऱ्या तरुणीला घेऊन हॉटेलमध्ये जात आहे. पत्नी म्हणून मला हे सहन होत नाही. यामुळे मी माझ्या माहेरी आली आहे'.
पवन सिंह आणि ज्योती सिंह यांच्यातील वाद वाढत चालला आहे. ज्योती सिंहने सोशल मीडियावर पती पवन सिंहच्या विरोधात पोस्ट देखील लिहिली होती. यादरम्यान बायकोने लखनौमध्ये जाऊन पवन सिंहच्या घरी जाणार असल्याचे सांगितलं होतं.
दुसऱ्या दिवशी ज्योती सिंह पवनच्या घरी जायला निघाली होती. मात्र, ज्योतीला घरात एन्ट्री मिळाली नव्हती. त्यानंतर ज्योतीने सोशल मीडियावर लाईव्ह येत चाहत्यांना आपबीती सांगितली होती. यावेळी ज्योती सिंह रागात होती. यावेळी ज्योती सिंहला ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते. मात्र, ज्योती पोलिसांसोबत जायला तयार नव्हती. ज्योतीने रडत रडत पती पवन सिंहवर केलेल्या गंभीर आरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.