Banjara: भावनांची भटकंती...! 'बंजारा' मधील टायटल साँग प्रदर्शित…

Banjara Movie: मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे.
Banjara Marathi Movie
Banjara Marathi MovieSaam Tv
Published On

Banjara Movie: मैत्रीचा आणि निसर्गाच्या साक्षीने घडलेल्या भटकंतीचा सुरेल अनुभव देणारे ‘बंजारा’ चित्रपटाचे टायटल सॉंग नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ‘बंजारा’ या शीर्षकातच एक भटकंतीची, मुक्ततेची आणि अनुभवांची भावना आहे. हे गाणे त्या भावना मनात खोलवर रुजवून जाते. या टायटल साँगमधून प्रेक्षकांना एक भावनिक प्रवास अनुभवता येईल. या गाण्याचे संगीत _ यांचे असून, _ यांच्या आवाजात ते अधिक जिवंत झाले आहे. तर _ यांच्या शब्दांनी मैत्रीचे क्षण, संवाद, आणि नात्यांची गडद किनार यांना सुंदरपणे व्यक्त केले आहे.

गाण्याबद्दल स्नेह पोंक्षे म्हणतो, “ ‘ बंजारा’मधून तीन मित्रांच्या माध्यमातून आम्ही मैत्रीचे एक वेगळे रूप उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. जिथे मैत्री म्हणजे फक्त मजा-मस्ती नाही, तर एकमेकांच्या प्रवासाचे साक्षीदार होणे आहे. गाणं चित्रीत करताना आणि त्यातील प्रत्येक फ्रेम अनुभवताना मला माझ्या स्वतःच्या आयुष्यातील अनेक क्षण डोळ्यांसमोर आले. या गाण्याने प्रेक्षकांना देखील असाच अनुभव येईल याची मला खात्री आहे.”

Banjara Marathi Movie
Rapper Tory Lanez: भयंकर! प्रसिद्ध रॅपरवर तुरुंगात जीवघेणा हल्ला; छाती आणि पाठीवर १४ वार

प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, “ बंजारा’या गाण्यातून आम्ही तीन मित्रांची भटकंती आणि त्यांचा भावनिक प्रवास दाखवला आहे. निसर्गाच्या सानिध्यात घडत असलेला मैत्री, आत्मशोधाचा हा प्रवास या गाण्यातून उलगडणार आहे. प्रत्येकाला त्यांच्या मैत्रीच्या दिवसांची आठवण होईल.”

Banjara Marathi Movie
Miss World 2025: मिस वर्ल्ड २०२५चे स्पर्धक आले भारतात; बुद्धपौर्णिमेनिमित्त घेतली बुद्धवनची भेट

मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन यांची आहे.तर शरद पोंक्षे प्रस्तुतकर्ता आहेत. येत्या १६ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com